---Advertisement---

विराटला ‘जोकर’ म्हणणे ‘त्या’ देशाच्या क्रिकेटरला पडले भलतेच महागात

On: मंगळवार, जुलै 21, 2020 12:17 PM
---Advertisement---

मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीवर विरोधी संघातील खेळाडू स्लेजिंग करत, त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. सन 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल हॅरिसनेही असे केले होते. पॉल हॅरिसने विराट कोहलीला जोकर म्हटले होते. मात्र, वेळ येताच विराट कोहलीनेही त्याला योग्य उत्तर दिले.

सन 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर होता. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा यांच्यात वाद झाला. सामन्यादरम्यान, स्लिपच्या दिशेने धावणाऱ्या रबाडाचा खांदा स्मिथला लागला. यानंतर रबाडावर दोन कसोटी सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.

रबाडावर अशी कठोर कारवाई केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल हॅरिस भडकला आणि त्याने विराट कोहलीचे नाव या वादात ओढले. तो म्हणाला की, ” विराट कोहली जोकर सारखा वागत असतो, पण आयसीसीने त्यांच्यावर का कारवाई केली नाही. मला वाटते, रबाडा किंवा दक्षिण आफ्रिकन संघाची काहीतरी अडचण आयसीसीला आहे.”

पॉल हॅरिसने विराट कोहलीची जोकरशी तुलना केली तेव्हा त्यावेळी भारतीय कर्णधार त्यावर प्रतिक्रिया दिला नाही. मात्र, वेळ येताच कोहली त्याला योग्य उत्तर देते. 5 नोव्हेंबर 2018 रोजी त्याच्या वाढदिवशी अ‍ॅप लाँचिंग दरम्यान चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यावेळी, एका चाहत्याने पॉल हॅरिसच्या विदूषक टिप्पणीवर प्रश्न विचारला.

हॅरिसच्या टिकेला उत्तर देताना कोहली म्हणाला की, “पॉल हॅरिस नावाच्या खेळाडूला मी ओळखतही नाही. हे ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यात असे कधी घडले? आम्ही दक्षिण आफ्रिकेत असताना हे घडले? कोण आहे पॉलिस हॅरिस. तो एखाद्या क्रिकेटपटूसारखा दिसत आहे.” अशा प्रकारे, पॉल हॅरिसच्या या टिप्पणीकडे विराट कोहलीने महत्त्व दिले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---