fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

परदीप नरवालच्या सर्वात मोठ्या विक्रमाला दे धक्का, पवन शेरावतने घडवला इतिहास

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२ऑक्टोबर) बेंगळुरू बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स संघात सामना पार पडला.या सामन्यात बेंगळुरू बुल्सने ५९-३६ असा विजय मिळवत प्ले-ऑफ मध्ये प्रवेश निश्चित केला. याबरोबरच या सामन्यांत बंगळुरुच्या पवन कुमार शेरावतने इतिहास घडवला. पवनने या सामन्यात रेडमध्ये तब्बल ३९ पॉइंट्स मिळवत मोठा पराक्रम केला.

पवन शेरावतने काल परदीप नरवालचा एकाच सामन्यांत सर्वाधिक रेड पॉइंट्सचा (३४ गुण) विक्रम मोडीत काढला. पवनने ३८ रेड मध्ये ३४ टच पॉइंट्स व ५ बोनस पॉइंट्ससह ३९ रेड पॉइंट्स मिळवले.

विशेष म्हणजे बेंगळुरू बुल्सने या सामन्यात मिळवलेल्या ३९ रेड पॉइट्सपैकी सर्व ३९ रेड गुण पवनचे होते.

याआधी प्रो कबड्डीमध्ये एका सामन्यात सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवण्याचा विक्रम परदीपच्या नावावर होता. त्याने सीजन ५ मध्ये हरियाणा सटीलर्स विरुद्धच ३४ रेड पॉइंट्स मिळवले होते. पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत रोहित कुमार असून त्याने यूपी योद्धा विरुद्ध ३० रेड गुण मिळवले होते.

पवनने या काल दमदार खेळ करताना सामन्याच्या मध्यंतरापर्यत १८ पॉइंट्स मिळवले होते. त्यामुळे प्रो कबड्डीत मध्यंतरापर्यंत वैयक्तिक सर्वाधिक पॉइंट्स मिळवण्याचा विक्रमही पवनच्याच नावावर झाला आहे.

याचबरोबर पवनने प्रो कबड्डीत ६०० रेड पॉइंट्सचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो सातवाच खेळाडु ठरला.

#प्रो कबड्डीत एका सामन्यांत सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू:

३९* पवन शेरावत विरुद्ध हरियाना स्टीलर्स (सीजन ७)

३४ परदीप कुमार विरुद्ध हरियाना स्टीलर्स (सीजन ५)

३० रोहित कुमार विरुद्ध यूपी योद्धा (सीजन ५)

#प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू – 

११०९ – परदीप नरवाल (१०५ सामने)

९४३ – राहुल चौधरी (१२० सामने)

८५६ – दीपक हुड्डा (१२३ सामने)

७९० – अजय ठाकूर (११५ सामने)

७३१ – मनिंदर सिंग (७९ सामने)

६६४ – रोहित कुमार (८९ सामने)

६१७ – पवन शेरावत (७६ सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वशांती क्रीडा मंडळ व शिवशक्ती महिला संघाचा शिवनेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

एयर इंडिया, भारत पेट्रोलियम संघाचा शिवनेरी कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश

You might also like