---Advertisement---

अभिनेत्री पायल घोषने ‘या’ भारतीय क्रिकेटर केले गंभीर आरोप, म्हणाली…

On: शुक्रवार, ऑक्टोबर 30, 2020 6:49 PM
---Advertisement---

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यप प्रकरणाशी निगडित एका माजी भारतीय क्रिकेटपटूचे नाव पुढे घेतले होते. आता ‘मुसलमान देव होऊ शकत नाही’ या वक्तव्याला अनुसरून तिने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याच्यावर नव्यानेच निशाणा साधला आहे.

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण सध्या आयपीएल च्या 13व्या हंगामातील सामन्यात हिंदी भाषेत समालोचन करण्यात व्यस्त आहे. याचदरम्यान त्याची कथित मैत्रीण अभिनेत्री पायल घोष ही पुन्हा पुन्हा त्याच्या बाबतीत वक्तव्य करीत आहे. आताही नाव न घेता तिने ट्विटरवर एक ट्विट केले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत चर्चेचा विषय बनू लागले आहे.

पायल घोषने असा साधला इरफान पठाणवर निशाणा

पायलने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘माझा एक विचित्र मित्र आहे, जो एक क्रिकेटपटू होता. त्याने व त्याच्या भावाच्या मेव्हण्याने माझ्या घरी रात्रीचे भोजन केले होते. तेव्हा जेवणानंतर प्लेट ठेवण्यासाठी तो जात असताना मी त्याला थांबवून म्हणाले ‘मी ठेवून देईन. अतिथी देवो भव.’ त्यावर त्याने उत्तर दिले की, कोणताही मुसलमान देव असू शकत नाही.’

या आधीही पायलने साधला होता इरफान पठाणवर निशाणा

अभिनेत्री पायल घोषने आधीही इरफान पठाणचे नाव अनुराग कश्यप प्रकरणा दरम्यान घेतले होते. पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात छेडछाडीचा गुन्हा नोंदवला होता. त्यावेळी तिने म्हटले होते की इरफान पठाण सोबत याबाबतीत बोलणे झाले होते. अनुरागने छेडछाड केल्याचे इरफानला देखील सांगितल्याचे तीचे म्हणणे होते.

या प्रकरणी सर्व माहिती असतानाही त्याने कसलीही भूमिका त्यावेळी घेतली नव्हती, असेही पायलचे म्हणणे आहे. पायलने पुन्हा एकदा इरफानवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इरफान पठाण मात्र पायलच्या वक्तव्यांना कसलीही दाद देत नसल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video

-CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम

-‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर

ट्रेंडिंग लेख-

-वयाच्या ५व्या वर्षी ज्याला पाहून क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला, त्याच्याच समोर ऋतुराजने केली दमदार खेळी

-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…

-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---