शुक्रवारी (८ एप्रिल) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा १६वा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने उत्कृष्ट प्रदर्शन केले. पंजाबचा मध्यक्रमातील फलंदाज लियाम लिविंगस्टोनने या सामन्यात वैयक्तिक अर्धशतक साकारले, जे चालू आयपीएल हंगामातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठरले.
मंगळवारी (५ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध पॅट कमिन्सने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशत ठरले. चालू हंगामातील देखील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्यानंतर आता गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्जच्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक साकारले. चालू आयपीएल हंगामातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. तिसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सचा एविन लुईस आहे, ज्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अवघ्या २३ चेंडूत वैयक्तिक अर्धशतक साकारले होते.
Liam Living-in a fast lane! ⚡
Second fastest fifty of #IPL2022! 😍#SaddaPunjab #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvGT @liaml4893 pic.twitter.com/mKhM3xfyRb
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 8, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा साकारल्या. यामध्ये लियाम लिविंगस्टोनने अवघ्या २७ चेंडूत ६४ धावा केल्या. यासाठी त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. गुजरातसाठी त्यांचा फिरकी गोलंदाज राशिद खानने २२ धावा खर्च करून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सच्या राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. शुबमन गिलने गुजरातसाठी सर्वात मोठी ९६ धावांची खेळी केली.
आयपीएल २०२२ मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारे खेळाडू
पॅट कमिन्स – १४ चेंडू (विरुद्ध मुंबई इंडियन्स)
लियाम लिविंग्सस्टोन – २१ चेंडू (विरुद्ध गुजरात टायटन्स)*
एविन लुईस – २३ चेंडू (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज)
संजू सॅमसन – २५ चेंडू (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद)
रॉबिन उथप्पा – २५ चेंडू (विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स)
आंद्रे रसल – २५ चेंडू (विरुद्ध पंजाब किंग्ज)
शिवम दुबे – २६ चेंडू (विरुद्ध पंजाब किंग्ज)
लियाम लिविंगस्टोन – २७ चेंडू (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘पंत जबाबदारीने खेळला, तर या आयपीएलमध्ये अपयशी ठरेल’, भारतीय दिग्गजाचा सल्ला