---Advertisement---

राजस्थानच्या फलंदाजाचा ९७ मीटरचा ‘मॉन्स्टर’ षटकार, जो ठरला सर्वांचेच आकर्षण; तुम्हीही पाहा

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 11:27 AM
---Advertisement---

लियाम लिविंगस्टोन, इंग्लंडच्या या फलंदाजांला त्याच्या विस्फोटक फटकेबाजीसाठी ओळखले जाते. त्यामुळे आयपीएलमध्येही त्याचा हा आक्रमक अंदाज पाहण्यासाठी चाहते आतुर होते आणि या फलंदाजानेही त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही. मंगळवारी (२१ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात दुबई येथे आयपीएल २०२१ चा ३२वा सामना झाला. या सामन्यात राजस्थानकडून खेळताना लिविंगस्टोनने छोटेखानी पण आतिषी खेळी केली. दरम्यान त्याने मारलेला एक गगनचुंबी षटकार आयपीएल दर्शकांसाठी लक्षवेधी ठरला.

लिविंगस्टोनने बाद होण्यापूर्वी १७ चेंडूंमध्ये १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २५ धावांची तुफानी खेळी केली होती. आपल्या या आकर्षक खेळीदरम्यान त्याने एक ‘मॉन्स्टर’ षटकार ठोकला होता. हा षटकार पाहून विरोधी पंजाब संघाच्या कर्णधाराचेही तोंड पडले होते. लिविंगस्टोनने १२ व्या षटकातील अर्शदिप सिंगच्या चौथ्या चेंडूवर हा खणखणीत षटकार मारला होता. या षटकाराचा चेंडू ९७ मीटर दूरपर्यंत जाऊन पडला होता.

त्याचा हा जबरदस्त षटकार पाहून सामना समालोचकही स्वत:ला त्याची प्रशंसा करण्यापासून थांबवू शकले नव्हते. त्यापुढील चेंडूवरही त्याने असाच षटकार खेचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पंजाबचा खेळाडू फॅबियन ऍलनने सीमारेषेवर अविश्वसनीय झेल घेत त्याच्या धुव्वादार खेळीचा अंत केला होता.

https://twitter.com/PrabS619/status/1440361005385543685?s=20

लिविंगस्टोनचा हा या आयपीएल हंगामातील पहिलावहिला सामना होता. यापूर्वी आयपीएल २०१९ मध्येही तो राजस्थान संघाचा भाग होता. मात्र या हंगामात त्याला राजस्थानकडून खेळताना विशेष कामगिरी करता आली नव्हती. तो ४ सामन्यांमध्ये फक्त ७१ धावा जोडू शकला होता. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ४४ धावा राहिली होती. मात्र यावर्षी लिंविगस्टोन आपल्या जुन्या रंगात परतल्याचे दिसते आहे. त्यामुळे येत्या सामन्यांतही तो संघासाठी उपयुक्त असे प्रदर्शन करत राजस्थानला त्यांचे दुसरे जेतेपद जिंकून देण्यात सहकार्य करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिनकडून ट्यूशन घेऊन मैदानात उतरला अन् पंजाबची घेतली शाळा! वाचा जयस्वालच्या ‘यशस्वी’ खेळीमागचं गुपित

चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात एलनने डाईव्ह मारत घेतला ‘फॅब्युलस’ झेल; फलंदाजानेही केलं कौतुक

ना हसू आलं, ना आसू! अंतिम षटकातील संघाच्या दुर्देवी पराभवाला पाहून राहुलच्या चेहऱ्याचा उडाला रंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---