सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रविवारी (१७ एप्रिल) मुंबई येथे झालेला सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यादरम्यान हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने डीआरएस घ्यायला खूप उशीर केल्याने मैदानावर गोंधळ निर्माण झाला. डीआरएसचा वेळ संपायला आला असताना शेवटच्या क्षणी विलियम्सनने डीआरएससाठी अपील केले. ज्यामुळे पंजाब संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो भलताच चिडला आणि त्याने याचा विरोधही केली. अखेर पंचांना मध्यस्थी करत हे प्रकरण शांत करावे लागले.
डीआरएसवरून झाला वाद
तर झाले असे की, पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालच्या जागी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनलेला प्रबसिमरन सिंग (Prabhsimran Singh) फलंदाजी करत होता. यावेळी हैदराबादकडून टी नटराजन गोलंदाजीसाठी आला होता. डावातील पाचवे षटक टाकत असताना त्याच्या षटकातील पाचवा चेंडू प्रबसिमरनच्या पॅडला लागून मागे यष्टीरक्षकाचा ग्लोव्ह्जमध्ये गेला. यावर नटराजनने पायचितसाठी पंचांकडे अपील केली. परंतु मैदानी पंचांनी त्यावर कोणताही निर्णय दिला नाही.
त्यानंतर मैदानात नटराजन, कर्णधार विलियम्सन (Kane Williamson) आणि इतर क्रिकेटपटूंमध्ये चर्चा झाली. त्यामुळे डीआरएस घेण्यास त्यांना भरपूर उशीर (Kane Williamson Late DRS Appeal) झाला. डीआरएस घेण्यासाठी केवळ १४ सेकंदांचा वेळ असतो. परंतु घडीत शेवटच्या शून्य सेकंदाला हैदराबादच्या कर्णधाराने डीआरएससाठी हात उंचावला. हे पाहून पंजाबचा फलंदाज बेयरस्टो (Jonny Bairstow) फार चिडला आणि तो पंचांशी याबद्दल विचारपूस करू लागला. मात्र पंचांनी विलियम्सनची अपील मान्य केली आणि डीआरएसमध्ये प्रबसिमरनची विकेट तपासली.
@cricketaakash @IrfanPathan
Sir kene williamson jo drs time khatm hone ke baad liya ho match par kitna asar karega ? pic.twitter.com/gV6jzwRp43— Kedarnath Umape (@KedarnathUmape) April 17, 2022
पायचितच्या डीआरएसवर फलंदाज निघाला झेलबाद
प्रबसिमरनच्या पायचित विकेटला डीआरएसमध्ये पाहिल्यानंतर तो पायचित नसून झेलबाद असल्याचे दिसून आले. चेंडू थेट यष्टीरक्षक निकोलस पूरनच्या हाती गेला होता आणि त्यानेही अचूक झेल टिपल्याने पंचांनी प्रबसिमरनला झेलबाद दिले. अशाप्रकारे ११ चेंडू खेळून १४ धावा करत प्रबसिमरनला पव्हेलियनला परतावे लागले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मयंक अगरवाल संघाबाहेर बसण्यामागचे कारण
या सामन्यात पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अगरवाल खेळला नाही. त्याच्या पायाच्या बोटाला लागल्याने तो या सामन्याला मुकला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी शिखर धवन पंजाबचे प्रभारी कर्णधारपद सांभाळेल. शिखरने मयंकबद्दल सांगितले आहे की, तो पुढच्या सामन्यापर्यंत बरा होईल. तसेच मयंक ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात प्रबसिमरन याला संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग २ हंगामात ५०० धावा कुटणाऱ्या धाकड फलंदाजाला सोडून मुंबईने केली चूक! आता होत असेल पश्चाताप
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते