चालु वर्षामध्ये क्रिकेटच्या दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. पहिला आशिया कप आणि दुसरा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तान सध्या आशिया कपचे यजमानपद भूषवत असून भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. एकदिवसीय विश्वचषकाबाबत शेजारील देश पाकिस्तानकडून सातत्याने भाषणबाजी चालू आहे. मात्र, याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चेअरमन नजम सेठी यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.
एकदिवसीय विश्वचषकाची नजम सेठींनी आयसीसीला दिली माहिती
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी (Pakistan Cricket Board President Najam Sethi) यांनी आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले (ICC President Greg Barclay) यांना अहमदाबाद येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यांबाबतची भीती व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नजम सेठी यांनी विश्वचषकादरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सामना खेळवण्याबाबत आयसीसीला माहिती दिली आहे.
कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू येथे सामने खेळायचे असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले. बार्कले आणि आयसीसीचे महाव्यवस्थापक ज्योफ अल्लार्डिस अलीकडेच पीसीबी अधिकाऱ्यांकडे आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकात (One Day International World Cup) तटस्थ ठिकाण शोधणार नाहीत. कारण, आसीसीने ‘हायब्रीड मॉडेल’वर आशिया चषकाचे सामने आयोजित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे.
पाकिस्तान सरकारने परवानगी दिली तरच आम्ही सामने खेळू
माध्यमांच्या माहितीनुसार, ‘नजम सेठी यांनी बार्कले आणि अॅलार्डाईसला कळवले की, पाकिस्तानला अहमदाबादमध्ये हा सामना नॉकआऊट किंवा अंतिम प्रकारचा सामना असल्याशिवाय खेळायचा नाही. याबाबत पीसीबीने (Pakistan Cricket Board) आयसीसीला (International Cricket Council) विनंती केली आहे. यावेळी ते म्हणाले की, जर पाकिस्तान सरकारने विश्वचषक खेळण्यासाठी परवानगी दिली तर भारतामध्ये पाकिस्तानचे सर्व सामने चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित करावेत.
अहमदाबादमधील संघाच्या सुरक्षेबाबत पाकिस्तान बोर्ड सध्या चिंतेत आहे. मात्र, 2005 मध्ये इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने मोटेरा येथे सामना खेळला होता. आयसीसीच्या महसुलातील पाकिस्तानचा वाटा पुढील पाच वर्षांच्या चक्रासाठी न वाढल्यास नवीन महसूल मॉडेल स्वीकारणार नाही, असेही सेठी यांनी स्पष्ट केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट