---Advertisement---

पीसीबीची वर्ल्डकपसाठी बीसीसीआयसमोर आणखी एक अट! ‘या’ गोष्टीची मागितली लेखी हमी

---Advertisement---

सध्या क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग या टी20 स्पर्धेचा तुफान आनंद लुटत आहेत. या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाची मेजवाणीदेखील असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच होणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. क्रिकेटप्रेमी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी खूपच प्रतीक्षा करत आहेत. मात्र, पाकिस्तान संघ विश्वचषकात सहभागी होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) आता नवी अट ठेवली आहे.

आगामी वनडे विश्वचषकाबाबत दोन्ही बोर्ड मागील वर्षभरापासून चर्चा करत आहेत. विश्वचषकाआधी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकात भारतीय संघाने सहभागी व्हावे अशी पीसीबीची अपेक्षा आहे. मात्र, बीसीसीआयने यासाठी स्पष्ट नकार दिलेला. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर, पाकिस्तानदेखील विश्वचषकासाठी येणार नाही अशी धमकी पीसीबीने दिलेली. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेत आशिया चषकातील भारताचे सामने युएईमध्ये खेळण्याचे निश्चित केले.

आता याच प्रकरणी पीसीबीने आणखी एक अट ठेवली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, नजम सेठी हे आशिया क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयकडे 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत लेखी हमी मागणार आहेत. 2025 चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात यावा, अशी मागणी पीसीबीकडून होईल.

बीसीसीआय या मागणीवर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे असेल. भारतीय संघ या चॅम्पियन्स ट्रॉफी सहभागी न झाल्यास स्पर्धा होण्याची शक्यता देखील कमी आहे. 2007 नंतर भारतीय संघ कधीही पाकिस्तानात खेळण्यासाठी गेलेला नाही. तर, 2013 नंतर भारत व पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवली गेली नाही.

‘(PCB Want Written Guarantee Of BCCi About 2025 Champions Trophy For 2023 ODI World Cup)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात आरसीबीचा पुन्हा राडा! वॉर्नर आणि सॉल्टशी भिडला सिराज
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---