काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण जेव्हा त्यांना कळाले की, त्यांचा पुतण्या फैजल इकबाल याची बलूचिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. तेव्हा त्यांनी बोर्डाची क्षमा मागितली. पण आता असे वृत्त समोर येत आहे की, फैजलने पीसीबीला धोका देत प्रशिक्षकपद मिळवले आहे. त्यामुळे त्याला या पदावरुन हटवण्यात आले आहे. PCB Withdraws Balochistan First XI Coach Faisal Iqbal
पीसीबीने आरोप केला आहे की, “फैजलने जेव्हा २००३मध्ये पिआयएमध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती, तेव्हा त्याने मॅट्रिकचे बनावट प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे त्यासंबंधी त्याची विचारपूस केली जात आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास लागेपर्यंत त्याला संघापासून वेगळे रहावे लागणार आहे. परिणामत: ३० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय टी२० विश्वचषकात फैजल त्याच्या संघाचा भाग नसेल.”
माध्यमातील वृत्तानुसार, फैजलच्या मॅट्रिक प्रमाणपत्राला पडताळणीसाठी जेव्हा कराचीमधील माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आले. तेव्हा त्यांनी ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे फैजलला कारण सांगा नोटिस पाठवण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, त्या प्रमाणपत्रावर फैजलचे नावदेखील वेगवेगळे आहे. प्रमाणपत्रावर फैजल मोहम्मद इकबाल असे नाव दिलेले आहे. तर नोकरीला जॉइन करताना त्याने फैजल इकबाल नाव लिहिले होते.
फैजलने पाकिस्तानकडून २६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २७.७६च्या सरासरीने ११२४ धावा केल्या होत्या. तर वनडेत १८ सामने खेळत त्याने ३१४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना जिंकताच संघ मालकीनीला झाला इतका आनंद की, याचेही भान राहिले नाही
“…..तर ‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार,” गंभीरने केली भविष्यवाणी
नारी पडली सर्वांना भारी! क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारी ‘ती’ ठरली दुसरीच खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
पंजाबच्या ‘या’ ५ शिलेदारांनी गाजवला सामना, बेंगलोरला केले चीतपट
‘या’ पाच कारणांमुळे विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा पंजाबविरुद्ध झाला पराभव
शतक एक विक्रम अनेक! जाणून घ्या केएल राहुलने केलेले ८ महत्त्वाचे विक्रम