भारतीय संघ गुरुवारी(१२ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. मात्र या दौऱ्याच्या आधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात काही बदल करावे लागले. दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंमध्ये वृद्धिमान साहाचेही नाव आहे. त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली होती. मात्र आता त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या रोहित शर्मालाही वनडे आणि टी२०साठी विश्रांती देण्यात आली आहे आणि कसोटी संघात स्थान दिले आहे. तर वरुण चक्रवर्तीची टी२० मालिकेसाठी निवड झाली होती मात्र त्याआधीच त्याला खांद्याची दुखापत झाली असल्याने तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडला. त्याच्याऐवजी टी नटराजनला भारतीय टी२० संघात संधी मिळाली.
त्यामुळे खेळाडूंच्या दुखापतीवरुन बरीच चर्चा मागील काही दिवसात झाली. याबद्दल आता बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आपली मते मांडली असून त्याने म्हटले आहे की बीसीसीआयचे कामकाज कसे चालते याबद्दल लोकांना माहित नाही त्यामुळे अशा चर्चा होत राहातात.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार गांगुलीने द वीकला सांगितले की ‘खेळाडूंच्या दुखापतीबद्दल कोणाला माहिती असते? आम्हाला माहिती असते, भारतीय संघाच्या फिजिओला माहिती असते, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला माहिती असते.”
तो म्हणाला, ‘मला वाटते की लोकांना माहित नसते की बीसीसीआयचे काम कसे चालते. बीसीसीआयचे ट्रेनर्स, फिजिओ आणि स्वत: वृद्धीला माहित आहे की त्याला २ हॅमस्ट्रिंगच्या समस्या आहेत. लोकांना दुखापतीबद्दल काही माहित नसते, त्यामुळे ते मुर्खपणाची बडबड करतात.’
गांगुली पुढे म्हणाला, ‘वृद्धी ऑस्ट्रेलियाला गेला आहे, कारण तो कसोटी मालिकेपर्यंत तंदुरुस्त होईल. तो मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाचा भाग नाही. आयपीएलच्या दरम्यान भारतीय फिजिओ आणि ट्रेनर्स दुबईमध्ये होते. भारतीय संघाचे फिजिओ डॉ. नितीन पटेल सर्व दुखापतींवर नजर ठेवून होते.’
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची सरावाला सुरुवात, पाहा फोटो
मुंबई इंडियन्सची जर्सी आणि मास्क घालून पाकिस्तान सुपर लीग खेळायला गेला हा खेळाडू; संघ झाला ट्रोल
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा