भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारपासून (२१ सप्टेंबर) सुरु झाला. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. त्या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने शानदार अर्धशतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली. मात्र, या अप्रतिम खेळी दरम्यान एक चेंडू थेट तिच्या हेल्मेटवर लागला. त्या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला.
मितालीची एकाकी झुंज
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताची अवस्था दयनीय केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मितालीने एकाकी झुंज देत १०७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. हे तिच्या वनडे कारकिर्दीतील ५९ वे आणि सलग पाचवे अर्धशतक ठरले.
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1440140922415501318?s=19
मितालीच्या डोक्यावर लागला भेदक बाऊंसर
भारतीय डावातील पंधरावे षटक ऑस्ट्रेलियाची प्रमुख अष्टपैलू एलिसा पेरी ही टाकत होती. षटकातील चौथा चेंडू पेरीने बाउंसर टाकला. मात्र, हा चेंडू व्यवस्थितपणे सोडता न आल्याने तो तिच्या हेल्मेटवर येऊन लागला. या दरम्यान तिने एक धाव देखील पूर्ण केली. यानंतर संघाचे फिजिओ मैदानात आले व त्यांनी मितालीची विचारपूस केली. मितालीने धीरोदात्तपणा दाखवत पुन्हा खेळणे सुरू ठेवले.
भारताचा पहिल्या सामन्यात पराभव
प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी केवळ २२५ धावा धावफलकावर लावल्या. कर्णधार मितालीने भारतासाठी सर्वाधिक ६१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी डार्सी ब्राऊनने चार बळी मिळवले. प्रत्युत्तरात रॅचेल हेन्स, एलिसा हिली व मेग लेनिंग यांनी अर्धशतके ठोकत ४१ षटकात सामना जिंकला. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/pbks-and-rr-head-to-head/
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित उतरणार राजस्थान रॉयल्स, पाहा संजूच्या संघाची ‘संभाव्य प्लेइंग इलेव्हन’
फॉर्मात असलेल्या राहुलची बॅट राजस्थानविरुद्ध ओकणार आग, ‘इतक्या’ धावा चोपत करेल मोठा विक्रम






