जगावरील कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीतही जगभरातील क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, काही क्रिकेटपटूदेखील अधीमधी कोरोना पॉझिटिव आढळतायेत. नुकत्याच संपलेल्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड मालिकेतही इंग्लंड संघातील सात सदस्य कोरोनाबाधित आढळले. त्यापाठोपाठ आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू देखील कोरोना पॉझिटिव आल्याची माहिती समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचा कोरोना अहवाल सकारात्मक
सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिपचा हंगाम खेळला जात आहे. या चॅम्पियनशिपमध्ये मिडलसेक्स काउंटी संघाचे नेतृत्व करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू पीटर हँड्सकॉम्ब याचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे सांगितले जातेय. त्यामुळे त्याला इतर संघापासून स्वतंत्ररीत्या विलिनीकरणात ठेवण्यात आले आहे.
तीस वर्षीय हँड्सकॉम्ब याला लँकेशायर विरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. त्यासह तो आणखी एका सामन्यासाठी मुकणार आहे. त्याच्याजागी आयर्लंडच्या टिम मर्टाग याने संघाचे नेतृत्व केले. हँड्सकॉम्ब सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. मागील १३ डावांमध्ये त्याला एकदाही अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. हँड्सकॉम्ब सध्या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघातूनही बऱ्याच काळापासून बाहेर आहे.
अशी राहिली आहे कारकिर्द
पीटर हँड्सकॉम्ब हा ऑस्ट्रेलियन संघाचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून १६ कसोटी सामने खेळताना २ शतके व ४ अर्धशतकांच्या मदतीने ९३४ धावा केल्या आहेत. तर, वनडे क्रिकेटमध्ये २२ सामन्यात ६३२ धावा त्याने ठोकल्या असून, दोन टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये एक हंगाम रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी देखील खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसला तरी, आयपीएलमुळे युवा खेळाडूंमध्ये आहे आत्मविश्वास”