---Advertisement---

काय सांगता? शून्यावर बाद होऊनही ‘या’ खेळाडूला प्रेक्षकांनी दिली होती मानवंदना

On: शनिवार, जून 12, 2021 10:52 PM
---Advertisement---

क्रिकेट इतिहासात डोकावून पाहिले तर अनेक चमकदार आणि दमदार खेळ्या पाहायला मिळतात. अनेक विश्वविक्रमी खेळ्यांव्यतिरिक्त अशा काही खेळ्या आहेत ज्या चाहते वेगळ्याच कारणासाठी विसरू शकणार नाहीत. अशीच एक खेळी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पीटर सुच याच्या नावावर नोंदली गेली आहे. त्याने सुमारे २२ वर्षांपूर्वी ७२ मिनिटे फलंदाजी केल्यानंतर शून्यावर बाद होण्याचा कारनामा केला. विशेष म्हणजे त्याच्या सुस्त खेळीनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेमुळे सर्वजण चकीत झाले होते. हे सांगण्याचे कारण म्हणजे आज सुच यांचा वाढदिवस आहे.

सुच याचा जन्म स्कॉटलंडच्या हेलेन्सबर्ग येथे १२ जून १९६४ रोजी झाला होता. सुचने काही काळ इंग्लंडचा फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे.

छोटीशी राहिली कारकीर्द
पीटर सुच ऑफ स्पिन गोलंदाजी करत. जून १९९३ मध्ये त्याने कसोटी सामन्यात पदार्पण शानदार पद्धतीने केले. मात्र, इतर अनेक इंग्लिश फिरकी गोलंदाजांप्रमाणे त्याची कारकीर्दही विशेष लांबली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात ६७ धावा देऊन ६ बळी घेतले. त्यानंतर त्याने अनेक कसोटी सामने खेळले. परंतु, अशा कामगिरीची पुनरावृत्ती तो करू शकला नाही.

खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतु, सुचने १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच पुनरागमन करत ५ बळी आपल्या नावे केले. मात्र, ऑगस्ट १९९९ मध्ये मँचेस्टर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर सुच पुन्हा कधीही इंग्लंडसाठी खेळला नाही.

अखेरच्‍या कसोटीत केली ती कामगिरी
मँचेस्टर कसोटीत इंग्लंडची सुरुवात चांगली नव्हती आणि त्यांनी १५२ धावांत ८ गडी गमावलेले. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या पीटरकडून संघाला काही धावांची अपेक्षा होती. मात्र, फलंदाजी करताना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. पीटर ७२ मिनिटे खेळपट्टीवर थांबला. यादरम्यान ५१ चेंडूंचा सामना करूनही त्याला आपले खाते उघडता आले नाही. परंतु, पीटर शून्यावर बाद झाल्यानंतरही प्रेक्षकांनी आनंद व्यक्त करत त्याला उभे राहून मानवंदना दिली.

चाहत्यांच्या या कृतीने स्वतः पीटर व क्रिकेटजगताला सुखद धक्का बसला. पीटरने आपल्या कारकीर्दीत ११ कसोटी सामने खेळले आणि ३७ बळी मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमेरिकन टी२० लीगमध्ये खेळणार जगातील सगळ्यात वजनदार क्रिकेटपटू, ११ भारतीय खेळाडूही होणार सहभागी

एकमेवाद्वितीय हिटमॅन! WTC Final खेळताच १४४ वर्षाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू बनणार

तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---