---Advertisement---

ऑलिंपियन्सना शुभेच्छा देण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे फोटो पॉईंट्स; माजी क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

---Advertisement---

पुणे। टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील तसेच देशातील खेळाडूंना चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा देण्याकरिता पुणे महापालिकेतर्फे फोटो पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. राज्याचे माजी क्रीडामंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी(२१ जुलै) सणस मैदानावर त्याचे उद्घाटन झाले.

काही महत्त्वाच्या ठिकाणी लवकरच फोटो पॉईंट्स बसवण्यात येणार आहेत. फोटो पॉईंट्सचा वापर करताना पुणेकरांनी कोविड सुरक्षेशी संबंधित मास्क आणि शारीरिक अंतराचे नियम काटेकोरपणे पाळून आपल्या खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात, असे अवाहनही महापालिकेतर्फे करण्याच आले आहे.

महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर यांच्या संकल्पनेतून हे फोटो पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत राज्य तसेच देशातील ऑलिंपिकपटूंना उज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी ऑलिंपियन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या माजी कबड्डी खेळाडू शकुंतला खटावकर, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, उपाध्यक्षा ज्योती कळमकर, नगरसेविका सरस्वती शेडगे, स्मिता वस्ते, गायत्री खडके, नगरसेवक रघुनाथ गौडा व पुणे भाजपा उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, पुणे भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सुंदर अय्यर, क्रीडा भारतीचे शैलेश आपटे, आंतरराष्ट्रीय रोलबॉल खेळाडू आदित्य वाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुंबई महापालिकेला जे कळलं नाही; ते पुणे महापालिकेला कळलं, असा उल्लेख करून आशिष शेलार यांनी फोटो पॉईंट्स उपक्रमाची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले, “कोविड महामारीच्या अवघड काळात खेळाडूंनी मनावर नियंत्रण ठेवून कष्टाने सराव केला आहे. या कष्टाचे फळ त्यांना नक्की मिळेल. ऑलिंपिकमध्ये चांगल्या कामगिरीसाठी माझ्यातर्फे सर्व खेळाडूंना शुभेच्छा.”

यावेळचे ऑलिंपिक प्रेक्षकांविना होणार असल्याने त्यांच्या मोलाच्या प्रोत्साहनाशिवाय सर्वोच्च कामगिरी करण्याचे अवघड आव्हान सर्व खेळाडूंसमोर आहे. हे आणि प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पार करून आपले खेळाडू यशाची पताका फडकवतील, असा विश्वास मला आहे. पुण्यातील सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो, असे महापौर मोहोळ यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होणार ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात, आयओसीची घोषणा

Tokyo Olympics: भारताची पहिली तुकडी पोहचली टोकियोमध्ये दाखल; खेळाडूंचे झाले भव्य स्वागत

लाईव्ह सामन्यात धांय-धांय गोळीबार, प्रेक्षकांसह खेळाडूंचाही उडाला थरकाप; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---