बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या होत्या.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्जने सावध सुरुवात केली होती.
यामध्ये मात्र कूकने स्वस्तात विकेट विकेट गमावली. त्यानंतर रुट आणि जेनिंग्जने इंग्लंडचा डाव संभाळताना पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली.
पण जेनिंग्जला मोहम्मद शमीने 42 धावांवर असताना बाद केले. मोहम्मद शमीला जेनिंग्जची विकेट मिळवून देण्यात कबुतराचाही मोठा वाटा आहे.
किस्सा असा आहे की इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या 35 व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजीस आला होता. मात्र हे षटक सुरू होेण्यापुर्वी एक कबूतर खेळपट्टीपाशी येउन थांबले होते. त्यावेळी जेनिंग्ज आणि रुटने त्या कबुतराला तिथून घालवण्याचा प्रयत्न केलेल्यानंतर ते गेले.
त्यानंतरच्या 35 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने जेनिंग्जला त्रिफळाचीत केले.
जेनिंग्जच्या या विकेटचे श्रेय नेटकरांनी ट्विटरवर मजेदार ट्विट करत कबूतराला दिले.
काही जणांनी हे कबूतर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणारे पहिले कबूतर आहे असे ट्विट केले आहे. तर काही जणांनी, पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने भारताला मदत करण्यासाठी हे कबूतर पाठवले आहे असे ट्विट केले.
That was the pigeon's wicket! 🙂#IndvsEng
— Amit Paranjape (@aparanjape) August 1, 2018
'I have got Keaton Jennings out/' #ENGvIND
— 𝗚𝗮𝘂𝘁𝗮𝗺 𝗦𝗼𝗱𝗵𝗶 (@GautamSodhi1) August 1, 2018
https://twitter.com/DennisCricket_/status/1024769314321195008
https://twitter.com/Zeushope/status/1024644556153704449
Come, lay your eggs at silly point if you dare 😝
— Pranjal (@Reveriessss) August 1, 2018
https://twitter.com/AlixM68/status/1024739248958844929
The wicket was a great coo for the bowler.
— Dave Rimbault (@RimbaultDave) August 2, 2018
First pigeon to get an England wicket since McGrath
— Vic Davies (@grumpbat) August 1, 2018
भारताकडून या डावात पहिल्या दिवसाखेर आर अश्विनने 60 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या होत्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी(2/62), उमेश यादव (1/56) आणि इशांत शर्मा(1/46) यांनी विकेट घेतल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम
–भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?
–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम