---Advertisement---

काय सांगता? ३७.५० कोटी देऊन खरेदी केलेले ‘हे’ क्रिकेटर दुसऱ्या टप्प्यातून बाहेर; बघा यादी

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 11:46 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तसेच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांनी युएईला हजेरी लावून सरावाला देखील सुरुवात केली आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही संघांना मोठा धक्का बसला आहे. संघातील परदेशी खेळाडूंनी काही ना काही कारणास्तव आयपीएल स्पर्धेचे उर्वरित हंगाम खेळण्यास नकार दिला आहे. तसेच फ्रँचायजींनीही काही खेळाडूंना संघातून बाहेर केले आहे.

गुरुवारी (२६ ऑगस्ट) बीसीसीआयने पत्रकार परिषद घेत, जे खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळणार नाहीत आणि जे खेळणार नाहीयेत त्यांच्याऐवजी कुठले खेळाडू पर्यायी खेळाडू म्हणून खेळणार आहेत? याची माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया. (Player replacement for second phase of ipl 2021)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून ४ परदेशी खेळाडू संघाबाहेर झाले आहे. या संघातील ॲडम झांपा (१.५० कोटी), केन रिचर्डसन (४ कोटी), फिन एलेन (२० लाख) आणि स्कॉट कुगेलाइन (५० लाख) यांनी आयपीएल स्पर्धेचे उर्वरित हंगाम खेळण्यास नकार दिला आहे. या खेळाडूंच्या जागी वनिंदू हसरंगा, दुश्मंता चमिरा आणि टीम डेविड यांची निवड करण्यात आली आहे.

पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज संघातील वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ या दोघांनी फिट नसल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. पंजाब किंग्ज संघाने झाय रिचर्डसनला १४ कोटी आणि मेरेडिथला ८ कोटी रुपये खर्च करून संघात स्थान दिले होते. या खेळाडूंच्या जागी पंजाब संघात नाथन एलिस आणि आदिल रशिद यांची निवड करण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी राजस्थान रॉयल्स संघात ग्लेन फिलिप्सला संधी देण्यात आली आहे. तर अँड्र्यू टायच्या जागी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकांवर असलेल्या तबरेज शम्सीला संधी देण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्स संघाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य गोलंदाज पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला १५.५० कोटी खर्च करत संघात स्थान दिले होते. त्याच्या ऐवजी टीम साउदीला संधी देण्यात आली आहे.

अशाप्रकारे या ४ संघांनी बाहेर केलेल्या खेळाडूंवर जवळपास ३७.५० कोटी रुपये खर्च केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

हे पराक्रम पाहा आणि तुम्हीच ठरवा ‘रनमशीन’ कोण ते? विराट कोहली की जो रूट?

रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी

जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---