मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी टी 20 स्पर्धा आहे, जिथे षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो. या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस फलंदाज खेळतात. रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी, आंद्रे रसेल, डेव्हिड वॉर्नर असे आणखी बरेच फलंदाज आहेत जे आयपीएलची शान आहेत. हे फलंदाज षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडतात आणि विरोधी संघाच्या हातातून सामना खेचतात. या स्पर्धेत असे काही फलंदाज आहेत जे काही चौकारांसाठी तडफडत आहेत. आम्ही तुम्हाला त्या फलंदाजांविषयी सांगू ज्यांना 48 चेंडू खेळूनही एक चौकार किंवा षटकार मारु शकले नाहीत.
युजवेंद्र चहल: युजवेंद्र चहलच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक चेंडू खेळून एकही चौकार आणि षटकार न मारण्याचा विक्रम आहे. चहलने आयपीएलचे 84 सामने खेळले आहेत आणि 14 डावात फलंदाजीची संधी मिळाली आहे. यावेळी त्याने एकूण 48 चेंडू खेळले आहेत आणि त्याने एकही चौकार मारलेला नाही.
प्रज्ञान ओझा: डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझानेही आयपीएलमध्ये कधीही चौकार-षटकार मारलेला नाही. डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या ओझाने 92 सामन्यांच्या 23 डावात फलंदाजी करताना केवळ 16 धावा फटकावल्या असून चौकार-षटकार मारण्यात तो यशस्वी झाला नाही.
मॅथ्यू वेडः ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज अत्यंत आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण मॅथ्यू वेडने आयपीएलमध्ये एकही ‘फोर-सिक्स’ मारलेला नाही हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वेडने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 3 सामने खेळले आहेत. त्याने केवळ 22 धावा केल्या आहेत. यात त्याने 33 चेंडू खेळले आणि त्यात एकही चौकार आणि षटकार मारला नाही.
सिद्धार्थ कौल: सिद्धार्थ कौलनेही आयपीएलमध्ये 10 डावांमध्ये फलंदाजी केली असून त्याला चौकार-षटकार ठोकण्यात अपयश आले आहे. या खेळाडूने आयपीएलमध्ये एकूण 28 बॉल खेळले आहेत आणि तो चेंडू सीमा पार करण्यात अपयशी ठरला.
यो महेश-जीवन मेंडिसः यो महेश आणि जीवन मेंडिस यांना आयपीएलमध्ये एकही चौकार ठोकता आलेला नाही. या दोन्ही फलंदाजांनी 27-27 चेंडू खेळले असून ते चौकार ठोकण्यात अपयशी ठरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज






