भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयोजित करत असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग आहे. जगातील सर्वात यशस्वी लीग बनवण्यासाठी बीसीसीआयने पूर्ण ताकद लावली होती. मात्र, आता भारतीय संघाच्या घसरत्या कामगिरीनंतर बीसीसीआयला काही चुकांची उपरती झाली आहे.
बीसीसीआयने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक बैठक घेतली. ज्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांवरून स्पष्ट झाले आहे की, आता एखाद्या खेळाडूला भारतीय संघात यायचे असेल तर, केवळ आयपीएलच्या कामगिरीवर त्याची निवड होणार नाही.
भारतीय संघ गेल्या वर्षी खेळाडूंच्या दुखापतींमुळे हैराण झाला होता. त्याचा परिणाम टी20 विश्वचषकातही दिसून आला. आता 2023 च्या विश्वचषकापूर्वी बीसीसीआय आपल्या प्रमुख खेळाडूंबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. आघाडीच्या खेळाडूंचा वर्कलोड आयपीएल फ्रँचायझींसोबत संयुक्तपणे हाताळला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विशेषत: ज्या खेळाडूंना दुखापत झाली आहे आणि जे विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या योजनेचा भाग आहेत त्यांच्यावरील वर्कलोड मॅनेजमेंटबाबत गांभीर्याने लक्ष दिले जाईल.
याशिवाय बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असेही सांगण्यात आले आहे की, भारतीय संघात निवड होण्यापूर्वी युवा खेळाडूंना पुरेसा देशांतर्गत हंगाम खेळावा लागेल. अलिकडच्या वर्षांत, रवी बिश्नोई, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती यांसारख्या खेळाडूंना आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे भारतीय संघात जागा मिळाली होती. मात्र, आता असे होणार नाही. खेळाडूंना आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
(Players Need To Perform In Domestic Cricket BCCI Take Decision)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर पुनरागमन करणार? गोलंदाजाचे मोठे विधान
आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय