इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव (IPL Auction 2022) बंगळुरू येथे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या हंगामापासून गुजराज लायन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नवीन संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे जुने आठ आणि दोन नवे संघ असे मिळून एकूण १० संघांनी या लिलावात सहभाग घेतला होता. या लिलावातून प्रत्येक फ्रँचायझीने आपली संघबांधणी जवळपास पूर्ण केली आहे. दरम्यान, या लिलावापूर्वी जुन्या ८ संघांना जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे काही खेळाडूंच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.
एकाच संघाकडून हे खेळाडू खेळत आहेत आयपीएल
आयपीएल (IPL) दरवर्षी होत असल्याने खेळाडूंचा लिलावही दरवर्षी आयोजित केला जातो. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक संघ बदललेला दिसतो, तर अनेक खेळाडू प्रत्येकवेळी वेगवेगळ्या संघांकडून खेळताना दिसतात. पण, आयपीएलमध्ये ७ असे खेळाडू सध्या आहेत, ज्यांनी आयपीएल पदार्पण केल्यापासून केवळ एकाच संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.
यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे विराट कोहली याचे (Virat Kohli). तो २००८ पासून आयपीएल खेळत असून त्याने प्रत्येकवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्त्व केले आहे. विशेष म्हणजे आयपीएल २०२२ चा हंगाम विराटचा बेंगलोरकडूनही १५ वा हंगामच असणार आहे. त्यामुळे तो असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून एकाच संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.
आयपीएल पदार्पण केल्यापासून केवळ एकाच संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटनंतर कायरन पोलार्ड, सुनील नारायण, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केन विलियम्सन आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंचा समावेश आहे. हे सातही खेळाडू आयपीएल २०२२ मध्येही आपल्या पहिल्या आयपीएल संघाचेच प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहेत. कारण, या सातही खेळाडूंना त्यांच्या संघांनी लिलावापूर्वीच संघात कायम केले होते (Players who have played under only one franchise in IPL and will continue with the same in IPL 2022.)
पोलार्ड २०१० पासून मुंबई इंडियन्सचे, नारायण २०१२ पासून कोलकाता नाईट रायडर्सचे, बुमराह २०१३ पासून मुंबई इंडियन्सचे, पंत २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्सचे, केन विलियम्सन २०१५ पासून सनरायझर्स हैदराबादचे आणि पृथ्वी शॉ २०१८ पासून दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करत आहे. आता हे खेळाडू आयपीएल २०२२ मध्येही याच संघांचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहेत.
आयपीएल लिलावात २०४ खेळाडूंवर लागली बोली
दोन दिवस पार पडलेल्या आयपीएल २०२२ लिलावात एकूण ६०० खेळाडूंचा समावेश होता. मात्र, त्यातील फक्त २०४ खेळाडूंवर बोली लागली. यातील ६७ खेळाडू परदेशी आहेत. तसेच १० संघांनी मिळून या लिलावात तब्बल ५५१ कोटी रुपये खर्च केले.
आयपीएल पदार्पण केल्यापासून केवळ एकाच संघाचे प्रतिनिधित्त्व करणारे खेळाडू
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- २०७ सामने)
कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स – १७८ सामने)
सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स – १३४ सामने)
जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स – १०६ सामने)
रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स – ८४ सामने)
केन विलियम्सन (सनरायझर्स हैदराबाद – ६३ सामने)
पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स – ५३ सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सने भारतीय खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर जोफ्रा आर्चरला सोडले, कारण घ्या जाणून
Video: फलंदाज क्रिजपासून लांब असतानाही विकेटकीपरने केले नाही रनआऊट, कारण ऐकून नक्कीच कराल कौतुक
सीएसकेने रैनाला संघात स्थान न देण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द सीईओंकडूनच खुलासा