कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाजांच्या कौशल्याची, मानसिकतेची परिक्षा पहिली जाते. अनेकदा खेळाडू कसोटीमध्ये परिस्थितीनुसार बचावात्मक खेळताना दिसतात. पण संधी मिळाली की चेंडूवर प्रहार करत धावाही जमवतात. आजही कसोटी क्रिकेटमध्ये ही गोष्ट बदललेली नाही.
पण कसोटी क्रिकेटमध्ये असेही काही फलंदाज आहेत ज्यांनी गरजेनुसार आक्रमक खेळ केला आहे. कसोटीमध्ये 11 फलंदाजांनी ३ चेंडूंवर सलग ३ षटकार मारण्याचा कारनामा केला आहे. पण सगल ४ चेंडूवर ४ षटकार मारण्याचा कारनामा केवळ ३ क्रिकेटपटूंना करता आला आहे. त्याच कपिल देव या भारताच्या दिग्गज माजी कर्णधाराचाही समावेश आहे.
कसोटीमध्ये सलग ४ चेंडूंवर ४ षटकार मारणारे क्रिकेटपटू –
१. कपिल देव –
कसोटीमध्ये सर्वात पहिल्यांदा ४ चेंडूंवर ४ षटकार मारण्याची कामगिरी कपिल देव यांनी केली आहे. ३० जुलै १९९० रोजी कपिल यांनी इंग्लड विरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोऑन पासून वाचवले होते.
पहिल्या डावात भारताने ९ विकेट्सवर ४३० अशी मजल मारली होती आणि भारताला फॉलो-ऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.
त्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु भारताने १ धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलो ऑन टाळला. त्या डावात कपिल यांनी नाबाद ७७ धावा केल्या होत्या.
२. शाहिद आफ्रिदी –
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने कसोटीत ४ चेंडूत ४ षटकार मारण्याचा पराक्रम २००६ मध्ये केला होता. त्याने लाहोर येथे भारताविरुद्ध खेळताना केला होता.
त्या सामन्यात पाकिस्तान आधीच चांगल्या स्थितीत होती. त्यामुळे आफ्रिदी कोणताही दबाव न घेता खेळत होता. त्याने हरभजन सिंगच्या ३४ व्या षटकातील पहिल्या ४ चेंडूवर ४ षटकार मारले. त्या डावात आफ्रिदीने १०३ धावांची खेळी केली होती.
कपिल देव नंतर कसोटीमध्ये ४ चेंडूवर ४ षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता.
३. एबी डिविलियर्स –
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स कसोटीमध्ये ४ चेंडूत ४ षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याने २००९ ला केपटाऊन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ २०९ धावांवर पहिल्या डावात सर्वबाद झाला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकने चांगली सुरुवात करत भक्कम धावसंख्या उभारली होती. त्यावेळी डेविलियर्स ११७ धावांवर एल्बी मॉर्केलसह फलंदाजी करत होता.
त्यावेळी डिविलियर्सने ऑस्ट्रेलियन गोलंदाज आंद्रे मॅकडॉनाल्डवर आक्रमण केले. डिविलियर्सने मॅकडॉनाल्डने टाकलेल्या षटकाच्या पहिल्या ४ चेंडूंवर ४ षटकार मारले होते. डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात १६३ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
ज्या संघाचं नाव घेतलं तरी गंभीरला यायचा राग, तेच करताय आता गंभीरचं कौतूक
या ५ खेळाडूंना आहे कसोटीत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय