बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे विश्वचषकाचा 9वा सामना खेळला गेला. रोहित शर्माने या सामन्यात भारतासाठी धमाकेदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्याचसोबत सलामीवीर फलंदाजाने वनडे विश्वचषकात आपल्या 1000 धावाही पूर्ण केल्या. यादरम्यान, रोहितच्या नावावर विश्वचषकातील एक मोठा विक्रम नोंदवला गेला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आता सर्वात कमी डावांमध्ये 1000 वनडे धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम याआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्या नावावर होता. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 30 चेंडूत अफगाणिस्तानविरुद्ध त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. याच धमाकेदार खेळाच्या जोरावर त्याने आपल्या 1000 वनडे विश्वचषकातील धावा पूर्ण केल्या आणि डेविड वॉर्नरची बरोबरी देखील केली. वॉर्नर आणि रोहित आता वनडे विश्वचषकात संयुक्तरित्या सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा करणारे फलंदाज आहेत. दोघांनीही यासाठी प्रत्येकी 19-19 डावा खेळले आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 20 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. (players who take Least innings to 1,000 runs in World Cups)
सर्वात कमी डावांमध्ये वनडे विश्वचषकात 1000 धावा करणारे फलंदाज
19 – डेविड वॉर्नर
19 – रोहित शर्मा
20 – सचिन तेंडुलकर
20 – एबी डिविलियर्स
21 – विव रिचर्ड्स
21 – सौरव गांगुली
स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
महत्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्यासाठी आजचा दिवस ठरला अविस्मरणीय, ४० हजार प्रेक्षकांसमोर…
हार्दिक पंड्याने बर्थडे बनवला खास, अफगाणी खेळाडूचा त्रिफळा उडवल्यानंतरची रिएक्शन व्हायरल