कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत असेही काही खेळाडू होते, ज्यांनाही स्पर्धा सुरू असताना किंवा त्यापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोनावर मात करून त्यांनी आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.
१) नितीश राणा : कोलकाता नाईट रायडर्स संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज नितीश राणा हा आयपीएल २०२१ स्पर्धेत कोरोनाबाधित होणारा सर्वात पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्याला आयपीएल २०२१ सुरू होण्यापुर्वी, २२ मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर २ एप्रिलला त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी तुफान फटकेबाजी केली होती .त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्याला २०१ धावा करण्यात यश आले होते. यासोबतच त्याने २ अर्धशतक झळकावले होते.
२)देवदत्त पडीक्कल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा युवा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल याने आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनतर या हंगामात देखील त्याला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु २२ मार्च रोजी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी तुफान फटकेबाजी केली होती. त्याने ६ सामन्यात १९५ धावा केल्या होत्या. यात त्याने एक शतक देखील झळकावले होते.
३) डॅनियल सॅम्स : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सचे चेन्नईमध्ये ३ एप्रिलला आगमन झाले होते. त्यांनतर त्याची कोविड चाचणी केली असता ती पॉझीटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला विलग्णवासात ठेवले होते. त्याला या हंगामात २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याला एक गडी बाद करण्यात यश आले होते.
४) अक्षर पटेल : दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला २८ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्याची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला विलग्नावासात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला ३ सामने संघाबाहेर राहावे लागले होते. त्याने पुनरागमन केल्यानंतर ४ सामने खेळायची संधी मिळाली होती. यात त्याने ६ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ मधील अनोखे पण शानदार विक्रम, जे तुम्हाला फारसे माहितही नसतील; वाचा
चर्चा तर होणारचं! ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोवर मराठमोळा ऋतुराज घायाळ, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया
धक्कादायक! ‘या’ माजी क्रिकेपटूचं अपहरण, बंदुकीचा धाक दाखवत करण्यात आली मारहाण






