आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात पार पडला. ज्यामध्ये 182 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये 62 विदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आले असून 8 खेळाडूंवर राईट टू मॅच (RTM) कार्डचा वापर करण्यात आला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) सारख्या खेळाडूंना लिलावात विक्रमी बोली लागली.
दुसरीकडे, 395 खेळाडू विकले गेले नाहीत. दरम्यान यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या मोठ्या खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. पण हे खेळाडू न विकले गेले तरीही आयपीएल 2025 मध्ये खेळू शकतात का? या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
लिलावात न विकलेले खेळाडू आयपीएल 2025 मध्ये खेळू शकतात. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रेंचायझी त्या खेळाडूला न विकलेल्या खेळाडूंपैकी एकासह बदलू शकते. याला दुखापत रिप्लेसमेंट म्हणतात. दुखापत रिप्लेसमेंटबाबत सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बदली खेळाडूची मूळ किंमत दुखापतग्रस्त खेळाडूच्या मूळ किमतीपेक्षा कमी असावी. उदाहरणार्थ, पृथ्वी शॉची मूळ किंमत 75 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूची किंमत 75 लाख रूपयांपेक्षा जास्त असेल तेव्हाच त्याची निवड होऊ शकते.
1) पृथ्वी शॉ- आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने (DC) पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) कायम ठेवले नाही. आयपीएल 2025च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रूपये होती.
2) डेव्हिड वॉर्नर- डेव्हिड वॉर्नरला (David Warner) आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने (DC) कायम ठेवले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत फक्त 2 कोटी रुपये होती.
3) शार्दुल ठाकूर- शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2025 साठी कायम ठेवले नाही. आयपीएल 2025च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत फक्त 2 कोटी रुपये होती.
हे 3 स्टार खेळाडू आयपीएलच्या आगामी हंगामात एखाद्या संघातील खेळाडूला दुखापत झाली, तर त्याच्या जागी फ्रेंचायझी या खेळाडूंना संधी देऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मानं मन जिंकलं…केएल राहुलसाठी दिलं मोठं बलिदान
रिषभ पंत की निकोलस पूरन, कोण होणार लखनऊचा नवा कर्णधार? संजीव गोयंका म्हणाले…
विराट कोहली ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ पासून केवळ एवढ्या धावा दूर, ब्रायन लाराचा मोठा विक्रम मोडणार!