---Advertisement---

आयपीएल २०२१ पूर्ण हो न होवो, खेळाडूंना मिळणार पगाराचे पूर्ण ४३८ करोड; वाचा पूर्ण माहिती

On: बुधवार, मे 5, 2021 9:26 PM
---Advertisement---

खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्यांना होत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. सुरूवातीपासूनच आयपीएल आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह उभे राहत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ही स्पर्धा भारतात आयोजित करणे हे एक मोठे जोखमीचे काम होते. बीसीसीआयने ही जोखीम स्वीकारली मात्र यात त्यांना अपयश आले आहे. विशेष म्हणजे अनेक क्रिकेट पंडितांनी अंदाज बांधला होता की आयपीएल 2020 प्रमाणेच आयपीएल 2021 स्पर्धादेखील यूएईमध्येच खेळविण्यात यावी, मात्र बीसीसीआयने भारतातच स्पर्धा खेळवण्याला प्राधान्य दिले.

आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाली असली तरी, खेळाडूंना त्यांचा पूर्ण पगार मिळणार आहे. खेळाडूंना या वर्षी एकूण 483 करोड रुपयांची रक्कम मिळणार आहे. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, खेळाडूंचा पगार आयपीएल संघांच्या इंश्यूरन्स पॉलिसीमध्ये जमा होत असतो. जर खेळाडूंना दुखापत झाली अथवा इतर कारणामुळे खेळाडू खेळू शकले नाही तरी त्यांना पूर्ण पगार मिळतो. खेळाडूंना तीन टप्प्यांमध्ये पगार दिला जातो.एक टप्पा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिला गेलेला आहे, तर इतर दोन टप्पे स्पर्धा संपल्यानंतर दिले जाणार असतात.

आयपीएल 2021 चा विचार केला आतापर्यंत 60 पैकी 29 सामने झालेले आहेत. अजूनही 31 सामने बाकी आहेत. आगामी काळात भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच टी20 विश्वचषक व इतर अनेक मालिकांमुळे बीसीसीआय समोर आयपीएल 2021 चा पुढील भाग पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की आयपीएल 2021 संदर्भात बीसीसीआय काय निर्णय घेते.

महत्त्वाच्या बातम्या –

कर्णधाराच्या जवळच्या व्यक्तींना मिळते संघात जागा, पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक आरोप

एप्रिलमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना नेपाळच्या ‘या’ क्रिकेटपटूचे आव्हान

ग्रेट भेट! आयपीएल स्थगित झाल्याने निराश झालेल्या महिला क्रिकेटपटूला चेन्नईने दिली खास भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---