---Advertisement---

एप्रिलमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना नेपाळच्या ‘या’ क्रिकेटपटूचे आव्हान

On: बुधवार, मे 5, 2021 8:35 PM
---Advertisement---

जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील या पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पुरुष गटात दोन पाकिस्तानी आणि एका नेपाळच्या क्रिकेटपटूचा समावेश आहे.

एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेपटूच्या पुरस्कारासाठी पुरुष गटात पाकिस्तानच्या बाबर आझम, फखर जमान आणि नेपाळच्या कुशल भुर्तेल यांचा समावेश आहे. यंदा पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. एप्रिल महिन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंचा एप्रिल महिन्याच्या या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला नाही.

अशी आहे नामांकित खेळाडूंची कामगिरी 

बाबर आझम सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामने खेळले. यात त्याने २२८ धावा केल्या. तसेच यात त्याच्या १०३ आणि ९४ धावांच्या खेळीचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने वनडे क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला होता. याबरोबरच त्याने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरुद्ध मिळून ७ टी२० सामने खेळले. यात त्याने ४३.७५ च्या सरासरीने ३०५ धावा केल्या. याबरोबरच तो मोहम्मद रिझवान बरोबर केलेल्या १९७ धावांच्या भागीदारीचा भाग होता.

दुसरे नामांकन मिळालेल्या फखर जमानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडेत १००.६६ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या. या मालिकेत त्याने २ शतकी खेळी केल्या, ज्यात १९३ धावांच्या खेळीचा समावेश होता. तसेच वनडे क्रमवारीत त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ७ वे स्थान मिळवले.

याशिवाय नेपाळच्या कुशलने एप्रिल महिन्यात एक इतिहास रचला. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलग ३ अर्धशतके केली. हा कारनामा कोणालाही यापूर्वी करता आला नव्हता. त्याने मलेशिया आणि नेदरलँड्सविरुद्धच्या तिरंगी टी२० मालिकेत ५ सामन्यांत ६९.५० च्या सरासरीने २७८ धावा केल्या होत्या.

या महिला क्रिकेटपटूंना मिळाले नामांकन 

एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेपटूच्या पुरस्कारासाठी महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली, मेगन शट आणि न्यूझीलंडच्या लेह कास्पेरेक यांना नामांकन मिळाले आहे. एप्रिमध्ये हेलीने न्यूझीलंडविरुद्ध ३ वनडे सामने खेळले. यात त्याने ५१.६६ च्या सरासरीने १५५ धावा केल्या. तसेच मेगन शटने याच मालिकेत ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबक कास्पेरेकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ वनडे सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. तिने एका सामन्यात ४६ धावांत ६ विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले.

अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार 

या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येते. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येते.

आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतात.

व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करते. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतात. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना 90 टक्के तर चाहत्यांच्या मतांना 10 टक्के प्राधान्य असते. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या – 

ग्रेट भेट! आयपीएल स्थगित झाल्याने निराश झालेल्या महिला क्रिकेटपटूला चेन्नईने दिली खास भेट

पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा जबराट बेली डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘आहा, काय नाचतेस’!

आहा कडकच ना! मैदानावर चौकार- षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पंड्या बनलाय कूक, वहिनींनी शेअर केला व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---