---Advertisement---

कर्णधाराच्या जवळच्या व्यक्तींना मिळते संघात जागा, पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक आरोप

On: बुधवार, मे 5, 2021 9:02 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेपासून दूर असलेला गोलंदाज जुनेद खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुनेदने एक खळबळजनक वक्तव्य केले असून, त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जुनेदने पाकिस्तान संघातील सहभागाबाबत एक सनसनीखेज वक्तव्य केले आहे.

मुलाखतीत बोलताना जुनेद म्हणाला, “जर तुमचे कर्णधार आणि संघ व्यवस्थापनासोबत चांगले संबंध असतील तर तुम्हाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी मिळते. जर तुमचे त्यांच्यासोबत जवळचे संबंध नसतील तर तुम्ही कायम संघातून आत-बाहेर होत राहतात.”

जुनेदला दुःख आहे की सतत शानदार कामगिरी करूनही त्याला संघात पुरेशी संधी मिळाली नाही. जुनेद म्हणाला ,”मी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा नियमित सदस्य होतो. मी ब्रेक ची मागणी करत होतो पण तरीदेखील माला ब्रेक मिळत नव्हता. मात्र यानंतर माझ्या नात्यांमध्ये दुरावा आला व त्यामुळे बाबी विस्कटत गेल्या. मी उत्तम कामगिरी करत होतो, पण मला पुरेशी संधी मिळाली नाही.”

जुनेद पुढे म्हणाला की, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी हसन अली नंतर पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज ठरलेलो होतो. तरीदेखील मला 2019 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे जुनेदचा 2019 विश्वचषकाच्या संघामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र नंतर त्याला संघाबाहेर केले गेले. 2019 विश्वचषकावेळी सरफराज अहमद हा पाकिस्तानचा कर्णधार होता.

सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असून पाकिस्तान संघ कामगिरीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, आगामी काळात जुनेदला पाकिस्तान संघात पुनरागमन करण्याची संधी मिळते अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

एप्रिलमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना नेपाळच्या ‘या’ क्रिकेटपटूचे आव्हान

ग्रेट भेट! आयपीएल स्थगित झाल्याने निराश झालेल्या महिला क्रिकेटपटूला चेन्नईने दिली खास भेट

पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा जबराट बेली डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘आहा, काय नाचतेस’!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---