वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. ही मालिका झाल्यानंतर आता बुधवार पासून (१६ फेब्रुवारी ) दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील तीनही सामने ईडन गार्डन्सवर पार पडणार आहेत. या मालिकेत देखील भारतीय संघ जोरदार विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
वेस्ट इंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत, भारतीय संघात असे १० खेळाडू उपलब्ध आहेत. ज्यांनी आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळवली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच ईडन गार्डन्सवर भारतीय संघाचा टी२० रेकॉर्ड पाहिला तर, भारतीय संघाने या मैदानावर ४ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ३ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. वनडे मालिकेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. विराट कोहलीसह श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव कडून देखील टी२० मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
अशी असू शकते पहिल्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
महत्वाच्या बातम्या :
युझीने नव्या आयपीएल फ्रँचायझीलाही नाही सोडले, राजस्थान रॉयल्सशी घेतली फिरकी; पाहून व्हाल लोटपोट
महिला वनडे क्रमवारीत कर्णधार मिताली दुसऱ्या स्थानावर कायम, मात्र स्म्रीतीला मोठे नुकसान
टी२० मोड ऑन! ‘रोहितसेना’ लागली सरावाला, वनडेनंतर टी२०तही विंडीजला देणार पराभवाचा धक्का?