वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा केल्या. यादरम्यान भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने वनडे क्रिकेटमध्ये आपले 50 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तात्काळ ट्विट करत त्याचे अभिनंदन केले.
विराट याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 49 वनडे शतके पूर्ण केली होती. या सामन्यात आपल्या डावाची सुरुवात करताना त्याने काहीसा संयम दाखवला. मात्र, नजर बसल्यानंतर त्याने आक्रमक फटके खेळले. त्याने 113 चेंडू खेळताना 117 धावा बनवल्या. यामध्ये नऊ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. त्याने याबरोबरच सचिन तेंडुलकर याचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.
Today, @imVkohli has not just scored his 50th ODI century but has also exemplified the spirit of excellence and perseverance that defines the best of sportsmanship.
This remarkable milestone is a testament to his enduring dedication and exceptional talent.
I extend heartfelt… pic.twitter.com/MZKuQsjgsR
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023
या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले,
‘आज, विराट कोहली याने फक्त त्याचे 50 वे वनडे शतकच झळकावले नाही तर उत्कृष्टता आणि चिकाटीच्या भावनेचे उदाहरण देखील दिले आहे. जे सर्वोत्तम खेळाची व्याख्या बनते. हा उल्लेखनीय टप्पा त्याच्या चिरस्थायी समर्पणाचा आणि अपवादात्मक प्रतिभेचा पुरावा आहे. मी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. भावी पिढ्यांसाठी ते एक मानक तयार करत राहो.’
या सामन्यात विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने आक्रमक शतक पूर्ण केले. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.
(PM Narendra Modi Congratulate Virat Kohli On His 50 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद