भारतासाठी आज खूपच आनंदाचा दिवस आहे. कारण टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय पठ्ठ्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून भालाफेकपटू नीरज चोप्रा आहे. त्याने भालाफेकीत दुसऱ्याच प्रयत्नात सर्वाधिक ८७.५८ मीटर अंतर कापले आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. यानंतर त्याच्यावर भारतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नीरजवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले की, “टोकियोमध्ये इतिहास लिहिला गेला आहे! नीरज चोप्राने आज जे साध्य केले आहे, ते कायम लक्षात राहील. तरुण नीरजने उत्तम कामगिरी केली आहे. तो उत्कटतेने खेळला आणि अतुलनीय धैर्य दाखवले. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.” (PM Narendra Modi Praised Neeraj Chopra For Win Gold In Olympics 2020)
History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020 https://t.co/2NcGgJvfMS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021
अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
ऑलिंपिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा भारतीय
बीजिंग ऑलिंपिक्स २००८ स्पर्धेत १० मीटर एअर रायफल या खेळात अभिनव बिंद्राने दमदार कामगिरी केली होती. यासह त्याने अव्वल क्रमांक पटकावत पहिले ऑलिंपिक सुवर्ण पदक जिंकले होते.
महत्वाच्या बातम्या-
-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक
-भारतीय गोल्फर अदिती अशोकला ऑलिम्पिकमधील पदकाने हुलकावणी दिली, पण देशासाठी ती इतिहास ठरली