---Advertisement---

‘उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प’, ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव! मोदींनीही केलं ट्विट

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 5:13 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात गाबा येथे चौथा कसोटी सामना पार पडला. या मैदानावर भारतीय संघाने पहिला विजय मिळवला. तसेच तसेच ऑस्ट्रेलियाची या मैदानावर गेल्या 3 दशके अपराजीत राहण्याची मालिका खंडीत केली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर 3 विकेट्सने मात तर केलीच, मात्र त्याचबरोबर बॉर्डर-गावसकर ही चार सामन्याची कसोटी मालिका सुद्धा जिंकली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात पराभूत केले. त्यामुळे या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या दुसर्‍या डावाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारतीय संघाने 96.6 षटकांत 7 गडी गमावून 329 धावा करत पूर्ण केले आणि 3 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाने गाबा येथे मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. त्यामुळे ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती संघाचे अभिनंदन करता ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाबद्दल ट्विट करताना लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कटता सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन! आपल्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’

https://twitter.com/narendramodi/status/1351436475414548480?s=19

ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 328 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा शुबमन गिलने केल्या. त्याने 146 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकार यांची आतिषबाजी करताना दमदार 91 धावांची खेळी केली. त्याचबरोबर भारतीय संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे आक्रमण आपल्या अंगावर झेलत 211 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकून महत्त्वपूर्ण 56 धावांची खेळी केली. त्याने भारतीय संघाची एक बाजू लावून धरली. तसेच अखेरीस रिषभ पंतने नाबाद 89 धावांचा तडाखा ऑस्ट्रेलियन संघाला दिला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने विजय प्राप्‍त केला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे झाला. हा सामना भारतीय संघाने 8 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर तिसरा सामना सिडनीत खेळला पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला. त्याच्यानंतर चौथा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्सने पराभूत केले. तसेच ही चार सामन्याची मालिका 2-1 या फरकाने जिंकून ऐतिहासिक विजय संपादन केला.

महत्त्वाच्या बातम्या –

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---