रोहित शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-केपीआयटी- सोलिंको रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरीज स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत अवनी देसाई व वीरा काकडे यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
रोहित शिंदे टेनिस अकादमी येथे आज सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत वीरा काकडेने तिस-या मानांकीत मीरा बंगालेचा 6-4 असा तर अवनी देसाईने चौथ्या मानांकीत रेहा बंगालेचा 6-0 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत सारा फेंगसेने समिक्षा औताणेचा 6-2 असा तर मृदुला साळुंखेने भार्गवी पाटीलचा 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
मुलांच्या गटात अव्वल मानांकीत आरव बेले याने सुमेर मेधीचा 6-1 असा तर आरुष पोतदारने पार्थ सरूकचा 6-1 असा पराभव केला. आरव जैन याने अव्दैत मुधोळकरचा 6-2 असा तर नील देसाईने साई उंद्रेचा 6-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : 12 वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
आरव बेले(1) वि.वि सुमेर मेधी 6-1
आरुष पोतदार वि.वि पार्थ सरूक 6-1
आरव जैन वि.वि अव्दैत मुधोळकर 6-2
नील देसाई वि.वि साई उंद्रे 6-2
ओम कलशेट्टी वि.वि समीरन शहापूरकर 6-4
शौर्य बोऱ्हाडे वि.वि अव्दैत गुंड 6-3
शुभ नाहटा वि.वि विश्वादित्य भोर 6-1
12 वर्षांखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी:
मृदुला साळुंखे वि.वि भार्गवी पाटील 6-1
अवनी देसाई वि.वि रेहा बंगाले(4) 6-0
सानवी जोशी वि.वि अव्दिका निजामपूरकर 6-0
प्रार्थना खेडकर वि.वि अनन्या बिलगीकर 6-1
वीरा काकडे वि.वि मीरा बंगाले(3) 6-4
अवंतिका सैनी वि.वि गीतिका पावसकर 6-1
सारा फेंगसे(2) वि.वि समिक्षा औताणे 6-2
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक चॅम्पियन भारताने ‘या’ अनोख्या स्टाईलने मानले चाहत्यांचे आभार
विराट अन् बाबरपेक्षा इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज भारी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे हैराण करणारं वक्तव्य