विश्वविजेत्या फ्रांसचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बाने बार्सिलोनासाठी मॅंचेस्टर युनायटेड सोडण्याचा पक्का निर्धार केला आहे.
२५ वर्षीय, पोग्बाने रशियात झालेल्या फिफाच्या अंतिम सामन्यात गोल केला होता. हा सामना फ्रांसने ४-२ने जिंकला.
जर त्याने बार्सिलोनाच्या अटी मान्य केल्या तर त्याला ८९.५ मिलियन पौंडचा फायदा होऊ शकतो. तसेच तो युनायटेडच्या दुप्पट असे आठवड्याला ३४६,००० पौंड कमावू शकतो.
माजी जुवेंट्सच्या या फुटबॉलपटूने २०१६मध्ये ८९ मिलियन पौंड या त्यावेळच्या विक्रमी रकमेत युनायटेडमध्ये सामील झाला होता. ब्रिटीश मिडिया रिपोर्टनुसार, पोग्बाला युनायटेड क्लब सोडायचा आहे हे त्याने त्याच्या युनायटेडच्या संघ सहकाऱ्यांना सांगितले आहे.
मात्र युनायटेडचे मॅनेजर जोस मौरिन्हो यांना पोग्बाच्या जागी दुसरा खेळाडू सापडत नसल्याने त्यांनी खेळाडूंच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. कारण उद्या प्रिमीयर लीगसाठी होणारी ही ट्रान्सफर विंडो बंद होणार आहे.
स्पॅनिश ट्रान्सफर विंडो ही या महिन्याच्या शेवटी बंद होणार आहे. तसेच पोग्बाचे मौरिन्हो यांच्यासोबत फारसे जमत नाही. याबाबत पोग्बाचे एंजट मिनो रायलो यांनी कसलेही स्पष्टीकरण दिले नाही.
“पोग्बा हा फ्रांस संघासारखा आहे. तो सुरूवातीला एक बरा नंतर उत्कृष्ठ फुटबॉलपटू बनला आहे”, असे मौरिन्हो म्हणाले.
युनायटेडने याआधीही बार्सिलोनाची ४४.५ मिलियन पौंडच्या रक्कमेस मनाई केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–चेल्सीने करारबध्द केलेला हा ठरला जगातील सर्वात महागडा गोलकिपर
–बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता