इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा तब्बल १२ सामने पार पडले आहेत. सोमवार रोजी (१९ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बारावा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानला ९ विकेट्स गमावत १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईने ४५ धावांनी सामना खिशात घातला.
हा चेन्नईचा या हंगामातील सलग दुसरा विजय होता. यापुर्वी पंजाब किंग्जला ६ विकेट्सने पराभूत करत त्यांनी हंगामातील पहिली विजयी पताका झळकावली होती. तर हंगामातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या हातून चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव झाला होता.
मात्र आता राजस्थानवर मात करत चेन्नईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. ४ गुणांची कमाई करत +१.१९४ नेट रन रेटसह त्यांनी या स्थानावर ताबा मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सर्वाधिक ६ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे.
तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांची एका स्थानाने घसरण झाली आहे. दिल्ली संघ +०.४५३ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई +०.३६७ नेट रन रेटमुळे चौथ्या स्थानावर घसरला आहे. याबरोबरच कोलकाता नाईट रायडर्स संघ टॉप-५ मध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
उर्वरित राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर अद्याप विजयाचे खाते उघडू न शकलेला सनरायझर्स हैदराबाद संघ तळाशी आहे.
आयपीएल २०२१ मधील १२ व्या सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका
१- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने ३, विजय ३, पराभव ०, गुण ०६, नेट रन रेट +०.७५०)
२- चेन्नई सुपर किंग्ज : (सामने ३, विजय २, पराभव १, गुण ०४, नेट रन रेट +१.१९४)
३- दिल्ली कॅपिटल्स : (सामने ३, विजय २, पराभव १, गुण ०४, नेट रन रेट +०.४५३)
४- मुंबई इंडियन्स : (सामने ३, विजय २, पराभव १, गुण ०४, नेट रन रेट +०.३६७)
५- कोलकाता नाईट रायडर्स : (सामने ३, विजय १, पराभव २, गुण ०२, नेट रन रेट -०.६३३)
६- राजस्थान रॉयल्स : (सामने ३, विजय १, पराभव २, गुण ०२, नेट रन रेट -०.७१९)
७- पंजाब किंग्ज : (सामने ३, विजय १, पराभव २, गुण ०२, नेट रन रेट -०.९६७)
८- सनरायझर्स हैदराबाद : (सामने ३, विजय ०, पराभव ३, गुण ००, नेट रन रेट -०.४८३)
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझ्यामुळे संघावर पराभवाची नामुष्की ओढावली असती,’ विजयानंतर कॅप्टन धोनीने मान्य केली आपली चूक
मुंबईकरचा चेन्नईकर बनलेला जेसन बेहरनडॉर्फ, वाचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील रोमांचक गोष्टी