---Advertisement---

तो ये है राज! सीएसकेसाठी संकटमोचक ठरलेल्या मोईन अलीने ‘यामुळे’ केली उत्कृष्ट गोलंदाजी, स्वतः केला उलगडा

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 8:19 AM
---Advertisement---

सोमवार रोजी (१९ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला ४५ धावांनी पराभूत केले. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू मोईन अलीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर १८८ धावा केल्या होत्या. यामध्ये मोईन अलीने २६ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच गोलंदाजी करताना त्याने ३ षटकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद केले होते. या उत्कृष्ट कामगिरीमुळेच राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १४३ धावा करता आल्या आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला.

सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर तो म्हणाला की, “मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा सध्या जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. माझे काम आहे धावा करणे. माझ्या खेळण्याची पद्धत हीच आहे. मी चेंडूला ओवर हिट करण्याचा प्रयत्न करत नाही. हे खूप चांगले होते. परंतु खेळपट्टी तितकी सोपी नव्हती. सुरुवातीला खूप कठीण वाटत होते.”

“तीन गडी बाद करण्याचा मुद्दा असा आहे की, तुम्ही कुठल्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी येता. माझ्यासाठी ती वेळ गोलंदाजी करण्यासाठी योग्य होती. त्यावेळी दोघेही डाव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करत होते. मला कल्पना होती की, जेव्हाही डाव्या हाताचे फलंदाज येतील मला गोलंदाजी दिली जाईल. मी नेहमीच तयार असतो. चेंडू नंतर बदलण्यात आला, त्यामुळे तो कोरडा होता. त्यामुळे आम्हाला गोलंदाजी करण्यास मदत मिळाली. मला वाटते दोन्ही संघाच्या दृष्टीकोनातून ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी योग्य होती,” असे त्याने शेवटी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझ्यामुळे संघावर पराभवाची नामुष्की ओढावली असती,’ विजयानंतर कॅप्टन धोनीने मान्य केली आपली चूक

मुंबईकरचा चेन्नईकर बनलेला जेसन बेहरनडॉर्फ, वाचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील रोमांचक गोष्टी

रविंद्र जडेजाने ४ झेल घेताच एमएस धोनीचे ‘ते’ ८ वर्षांपूर्वीचे ट्विट झाले व्हायरल, पाहा असं काय लिहिलं होतं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---