इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा रोमांच आणखी वाढला आहे. शनिवारी (२ ऑक्टोबर) झालेल्या डबल हेडर सामन्यांनंतर आता ४ संघाचे १० गुण झाले आहेत. एकीकडे राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता कुठला संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने सर्वात आधी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ १८ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ देखील १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी, पंजाब किंग्स संघ १० गुणांसह पाचव्या स्थानी, राजस्थान रॉयल्स संघ १० गुणांसह सहाव्या स्थानी, मुंबई इंडियन्स संघ देखील १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
अशाप्रकारे गुणतालिकेतील चौथ्या स्थानासाठी सध्या चार संघ शर्यतीत आहेत आणि या चारही संघांना प्लेऑफमध्ये धडक मारण्याची बरोबरीची संधी आहे.
कोणता संघ जाणार प्लेऑफमध्ये?
रविवारी (३ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवण्यात यश आले तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. परंतु जर पंजाब संघाला विजय मिळवण्यात यश आले तर हा संघ १२ गुणांसह टॉप -४ संघांमध्ये प्रवेश करेल.
तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजय मिळवण्यात यश आले तरी देखील त्यांना फायदा होणार नाही. कारण हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ विजया मिळवत १२ गुणांसह चौथ्या स्थानी कायम राहील.
तसेच मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. हा सामना जिंकुन दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. तर बुधवारी (६ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने येणार आहेत. तर ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारुनही ‘इतक्यांदा’ सीएसकेच्या नशीबी आलाय पराभव
पहिल्या डावात पंगा घेणाऱ्या कृणालला अश्विनचे बॅटीने उत्तर, ‘धोनी स्टाईल’ षटकारासह जिंकवला सामना
‘बचना ए हसीनों, दुबे आ गया’, सीएसकेला धू धू धुणाऱ्या शिवमला चाहत्यांचे हटके चीयर; व्हिडिओची चर्चा