इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंची चमक पाहायला मिळाली. देवदत्त पदिक्कल, ईशान किशन यासारख्या युवा फलंदाजांनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. यामध्ये विदेशी खेळाडूही मागे पडले नाहीत. कागिसो रबाडा, डेविड वार्नर यांनीही उत्कृष्ट कामगिरी करून आपली छाप सोडली. यातच झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल सामन्यांचा समालोचक पॉमी मंगवाने आयपीएल 2020 मधील परदेशी खेळाडूंचा सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे.
वॉर्नर, डिकॉक यांची सलामीवीर म्हणून केली निवड
मंगवाने या सर्वोत्कृष्ट संघामध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्सच्या युवा फलंदाज क्विंटन डी कॉक यांची निवड केली आहे.
ओएन मॉर्गन कर्णधार
त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या ओएन मॉर्गनला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याचबरोबर मॉर्गनला या प्लेयिंग इलेव्हनचा कर्णधारही बनविण्यात आले आहे.
पोलार्ड, बटलर यांचाही आहे समावेश
या संघात 5 व्या क्रमांकावर त्याने राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलरला स्थान दिले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज कायरन पोलार्डला सहाव्या क्रमांकावर स्थान दिले आहे.
ख्रिस मॉरिस एकमेव अष्टपैलू
मंगवाने आरसीबीचा ख्रिस मॉरिस याची एकमेव अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली आहे.
रशिद एकमेव फिरकीपटू
हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान हा या संघातील एकमेव फिरकीपटू आहे. 3 वेगवान गोलंदाज म्हणून त्यांने जोफ्रा आर्चर, कागिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट यांना संधी दिली आहे.
गेल, स्टोक्स यांना मिळाले नाही स्थान
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने निवडलेल्या या परदेशी खेळाडूच्या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये काही दिग्गजांना संधी दिलेली नाही. ख्रिस गेल, बेन स्टोक्स, मार्कस स्टॉइनिससारखे खेळाडू या संघात स्थान मिळवू शकले नाहीत.
असा आहे संघ :
डेविड वॉर्नर, क्विंटन डी कॉक, ओएन मॉर्गन (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, जोस बटलर (विकेटकीपर), कायरान पोलार्ड, ख्रिस मॉरिस, राशिद खान, जोफ्रा आर्चर, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह
विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे
चेन्नईच ट्विटर किंग्ज! आयपीएलमधील खराब कामगिरी नंतरही धोनीची CSK ‘या’ बाबतीत अव्वल
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी