भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर पूनम राऊतने रविवारी म्हणजेच १४ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले. या सामन्यात तिने १२३ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. तिच्या वनडे कारकिर्दीतील हे एकूण तिसरे शतक ठरले.
मात्र या सामन्यात पूनमने शतक झळकावून देखील भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. परंतु पूनमला मात्र या शतकाचा फायदा झाला आहे. या शतकामुळे आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत पूनमने मोठी झेप घेतली आहे.
अव्वल २० मध्ये घेतली झेप
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील तीन सामन्यात पूनम राऊतने नाबाद ६२, ७७ आणि नाबाद १०४ धावांच्या खेळ्या केल्या होत्या. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत तिने अव्वल २० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. आपल्या पूर्वीच्या क्रमवारीत ८ स्थानांनी सुधारणा करत पूनमने १८वे स्थान गाठले आहे.
भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मंधाना या क्रमवारीत सातव्या स्थानी कायम असून तर भारतीय कर्णधार मिताली राज नवव्या क्रमांकावर कायम आहे. भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा करत १५वे स्थान गाठले आहे.
दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिझेल लीने दमदार कामगिरीच्या बळावर यात पहिले स्थान गाठले आहे. यासह महिला फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारी ती दक्षिण आफ्रिकेची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
Take a bow, @zella15j ????
Her superb form in the ongoing series against India has helped Lizelle Lee shoot up to the top of the @MRFWorldwide ICC Women's ODI Rankings for batters! pic.twitter.com/yAU76yfl6x
— ICC (@ICC) March 16, 2021
त्याचवेळी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची डावखुरी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने चार स्थानांनी सुधारणा करून १८वे स्थान गाठले आहे. तर वेगवान गोलंदाज मानसी जोशीने देखील आपल्या क्रमवारीत सुधारणा केली असून तिने ६९व्या ६४वे स्थान गाठले. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज अयाबोंगा खाकाने देखील प्रगती केली असून तिने नववे स्थान गाठले आहे.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 3rd T20: टॉस जिंकून इंग्लंडचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; रोहितचे झाले भारतीय संघात पुनरागमन
डिलिट करा ते! आयसीसीने शेअर केलेल्या एमएस मलिंगा फोटोवर चाहते भडकले
व्हिडिओ : सचिनच्या १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्यांनी केले खास सेलिब्रेशन






