---Advertisement---

टी२० विश्वचषक तोंडावर, पण त्याआधीचे सराव सामनेही महत्त्वाचे, वेळापत्रक झालंय घोषित; टाका नजर

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 5:14 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा थरार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. येत्या काही दिवसात प्लेऑफ सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १७ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान पात्रता फेरीतील सामने पार पडणार आहे. यापूर्वी सराव सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे, ज्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी ८ बलाढ्य संघांनी सुपर १२ मध्ये प्रवेश केला आहे. या संघांना सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. हे सामने २ दिवस म्हणजेच १८ आणि २० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहेत. यामध्ये प्रत्येक दिवशी ४-४ सामने खेळवले जाणार आहेत. याचा अर्थ असा की, २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सुपर १२ फेरीपूर्वी प्रत्येक संघाला २-२ सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

‘या’ दोन संघांसोबत होणार भारतीय संघाचा सामना 
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय संघ हा विश्वचषक जिंकण्यासाठी जास्त जोर लावणार यात काहीच शंका नाही. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सराव सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांसोबत होणार आहेत. या बलाढ्य संघांसोबत सराव सामने खेळण्याचा फायदा त्यांना सुपर १२ फेरीत होऊ शकतो. सुपर १२ फेरीत भारतीय संघाचा सामना पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांसोबत होणार आहे.

तर ऑस्ट्रेलिया संघाचा सराव सामना न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. तसेच इंग्लंड संघाचा सराव सामना न्यूझीलंड संघासोबत रंगणार आहे. हे सराव सामने दुबई आणि अबू धाबीमध्ये पार पडणार आहे. या दोन दिवसांमध्ये ८ सराव सामने रंगणार आहेत. तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, भारतीय संघाचे सर्व सराव सामने स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत.

असे असे टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक 

सोमवार १८ ऑक्टोबर – शेख जायद स्टेडियम, अबू धाबी
पहिला सामना – अफगानिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका ,दुपारी ३:३० वाजता
दुसरा सामना – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया , संध्याकाळी ७:३० वाजता

सोमवार १८ ऑक्टोबर – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम,दुबई 
तिसरा सामना – पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, दुपारी ३:३० वाजता
चौथा सामना – भारत विरुद्ध इंग्लंड, संध्याकाळी ७:३० वाजता

बुधवार २० ऑक्टोबर, शेख जायद स्टेडियम, अबू धाबी 
पाचवा सामना – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, दुपारी ३:३० वाजता
सहावा सामना – दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी ७:३० वाजता

बुधवार २० ऑक्टोबर – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई 
सातवा सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी ३:३० वाजता
आठवा सामना – अफगानिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, संध्याकाळी ७:३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या-

फिलिप्स ५० मीटरपर्यंत धावला, चेंडू बाउंड्रीला लागायच्या आत चौकार अडवला; फिल्डिंग बघून म्हणाल, अय्योव!

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात गोलंदाजी न केलेल्या हार्दिकवर गंभीरचा निशाणा; म्हणाला, ‘तो सर्वात मोठी समस्या’

कोहलीची हाव कधीही संपत नाही, त्याला जगात सर्वोत्कृष्ट बनायचंय; माजी सहकाऱ्याने गायले गुणगान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---