---Advertisement---

एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेर व भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरण यांच्यात विजेतेपदासाठी लढत

On: शुक्रवार, नोव्हेंबर 23, 2018 9:40 PM
---Advertisement---

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेर व भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरण या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला., तर दुहेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक क्र.110असलेल्या भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरण याने जागतिक क्र.102असलेल्या मालदोवियाच्या राडू एल्बोटचा 1-6, 6-4, 6-4 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

2तास चाललेल्या या सामन्यात राडूने आक्रमक खेळ केला. या सेटमध्ये राडूने 4थ्या व 6व्या गेममध्ये प्रजनेशची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये प्रजनेशने चतुराईने खेळ करत 3ऱ्या गेममध्ये राडूची सर्व्हिस भेदली व आपली आघाडी कायम ठेवत हा सेट 6-4असा जिंकून आपले आव्हान कायम राखले.

तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये प्रजनेश बिनतोड सर्व्हिससमोर राडू निष्प्रभ ठरला. 3ऱ्या सेटमध्ये प्रजनेशची सर्व्हिस ब्रेक केली व 2-1अशी आघाडी घेतली. त्यांनतर पिछाडीवर असलेल्या राडूला प्रजनेशने कोणतीही संधी दिली नाही व हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवत विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

एकेरीत उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूरचा 6-3, 3-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.

दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने स्लोव्हाकियाच्या आंद्रेज मार्टिन व चीनच्या हंस पॉडलिपींक कॅस्टीलो यांचा टायब्रेकमध्ये 7-6(7), 6-0असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पुरसेल व लूक सेव्हिल यांचा (4)6-7, 6-3, 10-6असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ( उपांत्य फेरी):

इलियास यमेर(स्वीडन)(3)वि.वि.

ब्रेडन चेन्यूर(कॅनडा)6-3, 3-6, 6-3;

प्रजनेश गुन्नेश्वरण(भारत)(4)वि.राडू एल्बोट(मालदोविया)(1)1-6, 6-4, 6-4;

दुहेरी गट: उपांत्य फेरी:

हसीह चेंग पेंग(तैपेई)/यांग सुंग हुआ(तैपेई)वि.वि.मॅक्स पुरसेल(ऑस्ट्रेलिया)/लूक सेव्हिल(ऑस्ट्रेलिया)(4)6-7, 6-3, 10-6;

एन विजय सुंदर(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया)/हंस पॉडलिपींक कॅस्टीलो(चीन)(4)7-6(7), 6-0;

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment