आजचा दिवस (5 जानेवारी) क्रिकेटप्रेमींसाठी खास मानावा लागेल. कारण आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंबईतील विद्यार्थी प्रणव धनावडे (Pranav Dhanawade) याने जगातील सर्वाधिक धावांची खेळी केली होती. त्याने या एका डावात 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रणवचे वय 15 वर्ष होते आणि त्याने 327 चेंडूत 1009 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याच्या 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील आणि पातळीवरील एका डावातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. त्याचा विक्रम अजूनही अबाधीत आहे.
यापूर्वी भारतात जन्मलेल्या एईजे कोलिंस यांनी 1889 मध्ये शालेय पातळीवर 628 धावांची खेळी केली होती. प्रणवने हा विक्रम 2016 मध्ये मोडीत काढला होता. त्याने या डावात खेळलेल्या एकूण चेंडूंपैकी 188 चेंडू सीमारेषेपार पाठवले होते. हा सामना प्रणवची शाळा केसी गांधी इंग्लिश स्कूल आणि आर्य गुरुकुल स्कूल यांच्यात झाला होता. केसी गांधी इंग्लिश स्कूलने प्रणवच्या खेळीच्या जोरावर 1464 धावांवर त्यांचा डाव घोषित केला होता. ही क्रिकेटच्या इतिहासातील एका संघाने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 1926 मध्ये विक्टोरिया संघाने न्यू साउथ वेल्स संघासोबतच्या सामन्यात 1107 धावा केल्या होत्या.
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने यापूर्वी एका डावात 546 धावा केल्या होत्या, प्रणवने हा विक्रम देखील मागे टाकला होता. शॉने 2019 हॅरिस शील्ड ट्रॉफीमध्ये हा पराक्रम केला होता.
भारताचा दिग्गज विराट कोहली प्रणवचा आदर्श आहे. प्रणवला आतापर्यंत चार वेळा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी ट्रॉफी मिळाली आहे.
प्रणवचे वडील ठाण्यामध्ये रिक्षाचालक आहेत, तरीही त्यांनी प्रणवला मिळणारी मोठी आर्थिक मदत नाकारली. सर्वाधिक धावांची खेळी करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (MCA) प्रणवला प्रती महिना 10 हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली होती. परंतु प्रणव आणि त्याच्या कुटुंबाने लाखो रुपयांची ही स्कॉलरशिप बंद करण्याची विनंती केली होती. यामागे त्यांनी तो आता अपेक्षित प्रदर्शन करू शकत नाहीय, असे कारण सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर त्याला मिळणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत मारिन चिलीचचा उपांत्यपुर्व फेरीत दिमाखात प्रवेश
व्हिडिओ पाहा –