Ranji Trophy 2024: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहे. तो सध्या कोलकाता संघाकडून खेळत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. भारतीय संघाने सुरवातीच्या दोन सामन्यांसाठी संघ घोषीत केला आहे. या दरम्यान, प्रसिद्ध कृष्णाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तो कर्नाटक विरुद्ध गुजरात यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे.
कर्नाटक विरुद्द गुजरात यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) त्याचं वैयक्तिक पंधरावं षटक टाकताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या पंधराव्या षटकात पाचवा चेंडू टाकताना त्याचे स्नायू तानेले गेले. यामुळे त्याला लगेच मैदान सोडाव लागलं. त्याने या सामन्यात 14.5 षटकात 2 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने 4 निर्धाव षटकेही टाकली.(prasidh-krishna-injured-during-ranji-trophy-match-gujarat-vs-karnataka)
कृष्णा भारतासाठी 2 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने दोन विकेट्सही घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 17 वनडे सामन्यांमध्ये एकूण 29 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडीजच्या एका वनडे सामन्यात त्याने 4 विकेट मिळवल्या होत्या ही त्याची वनडे मधील सर्वोत्कृष्ट कामगीरी आहे. भारतासाठी खेळताना त्याने टी20मध्ये 5 सामन्यात एकूण 8 विकेट्स मिळवल्या आहेत. यासोबतच त्याने 14 प्रथम श्रेणी सामन्यात 56 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए च्या एकूण 67 सामन्यात त्याने आजपर्यंत एकूण 113 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच्या संघात प्रसिध कृष्णाची निवड झालेली नाही. अशातच या दुखापतीतून सावरण्यासाठी कमीतकमी चार ते सहा आठवड्यांचा वेळ लागु शकतो असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे उर्वरीत सामन्यांसाठी सुद्धा त्याची निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे. (Big blow to Karnataka team, Prasidh Krishna injured in current match likely to miss remaining matches)
महत्वाच्या बातम्या
विराट-रोहितला बाबरपासून मोठा धोका, टी-20 मधील मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत
ध्रुव जुरेलची भारताच्या कसोटी संघात निवड, पाहा लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा कसा बनला क्रिकेटर