दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याची कामगिरी चांगली नव्हती. त्याने खूप धावा दिल्या आणि त्याला जास्त विकेट्स घेता आले नाहीत. त्यामुळे भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाने प्रसिध कृष्णाच्या कसोटी संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “प्रसिध कृष्णाकडे दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्याचे कौशल्य अद्याप नाही.”
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) याने 15 षटके टाकली, ज्यात त्याने 61 धावांत एक विकेट्स घेतली. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर कृष्णाला आपला ठसा उमटवता आला नाही आणि त्याचे चेंडूवरील नियंत्रण चांगले दिसत नव्हते. त्याला अजिबात चांगली गोलंदाजी करता आली नाही.
खराब कामगिरीमुळे प्रसिद्ध कृष्णावर बरीच टीका होत आहे. पीटीआयशी बोलताना एका माजी वेगवान गोलंदाजाने सांगितले की, प्रसीध कृष्णाने कसोटी सामने अजिबात खेळायला नको होते. तो म्हणाला, “प्रसिद्ध कृष्णा अद्याप कसोटी क्रिकेटसाठी तयार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्याचे कौशल्य त्याच्याकडे नाही. ते प्रसीध कृष्णासोबत गेले कारण तो डेकवर मारू शकतो पण प्रसिध कृष्णा शेवटची रणजी ट्रॉफी कधी खेळला हे ते विसरलेत. फक्त एक इंडिया अ सामना खेळून फायदा होत नाही. गोष्ट अशी आहे की, भारताचे नवे गोलंदाज शमी, बुमराह, इशांत आणि सिराजसारखे उत्साह आणू शकत नाहीत. आवेश खान हा देखील प्रसिद्ध कृष्णासारखा गोलंदाज आहे पण तो जास्त लाल चेंडू क्रिकेट खेळतो आणि त्यामुळेच तो चांगल्या लांबीने गोलंदाजी करू शकतो. नवदीप सैनी हाही सहा वर्षांपासून भारत अ संघाकडून खेळत आहे.” (Former bowler’s shocking statement about Prasidh Krishna, who flopped in the first Test Said He deserves to play Tests)
हेही वाचा
Ms Dhoni Viral Video: एमएस धोनीने चाहत्याला दिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला, धक्कादायक कारण आले समोर
Team Of The Year 2023: माजी क्रिकेटपटूने निवडला 2023 वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ, ‘या’ सहा भारतीय खेळाडूंना दिलं स्थान