भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (india tour of South Africa) या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण, आतापर्यंत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकली नाहीये. तसेच या दौऱ्यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे.(Cheteshwar pujara)
भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. ४० डाव उलटून गेले तरीदेखील त्याला शतक झळकवता आले नाहीये. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौरा ही त्याच्यासाठी शेवटची संधी ठरू शकते. तसेच त्याला संघ व्यवस्थापकांकडून एक खास संदेश देखील मिळाला आहे. ज्याचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटूने केला आहे.(Praveen amre statement on Cheteshwar pujara)
रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला कसोटी मालिकेत संधी मिळणे जवळजवळ निश्चित आहे. अशातच भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रवीण आमरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला खात्री आहे की, चेतेश्वर पुजाराला संघ व्यवस्थापकांडून एक खास संदेश मिळाला आहे. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ६५८९ धावा केल्या आहेत. या सर्व धावा त्याने कठीण परिस्थितीत केल्या आहेत. त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. जेव्हा संघाला त्याची गरज होती तेव्हा त्याने धावा केल्या. त्यांच्यासाठी हे सोपे नव्हते.”
हेही वाचा- कोणी टॉप तर कोणी फ्लॉप! दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केलेले सात भारतीय कसोटीवीर
तसेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेबाबत बोलताना प्रवीण यांनी म्हटले की, “त्या दोघांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळेच ते संघात कायम आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या क्षमतेवर शंका न घेणे आणि त्यांना संधी देणे महत्त्वाचे आहे. रहाणे आणि पुजारा या दोघांनी नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे.”
असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ :
विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
हे नक्की पाहा :