मुंबई। इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सीझनमध्ये यंदा 10 संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटच्या मैदानाला यातून आगळी- वेगळी शोभा आली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामात उतरलेल्या एकाहून एक सरस खेळाडूंमध्ये एक गोलंदाज असाही दिसतोय, ज्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. यानं आपली शेवटची आयपीएल मॅच आजपासून 5 वर्षांपूर्वी खेळली होती. मात्र, त्याचा रेकॉर्ड आजही कायम आहे.
हा गोलंदाज कुणी दुसरा नाही, तर प्रवीण कुमार (Praveen Kumar) आहे. आयपीएलच्या 5 संघांचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज प्रवीण कुमारने आपला शेवटचा आयपीएल सामना गुजरात लॉयन्सच्या संघाकडून खेळला होता. त्याच्या गोलंदाजीची जादू काही अशी आहे की, आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वाधिक मेडन ओव्हर (Maiden Overs) (निर्धाव षटके) टाकलेत. खास गोष्ट ही की, प्रवीण कुमारच्या या रेकॉर्डला आजवर कुठलाच गोलंदाज तोडू शकलेला नाही. प्रवीण कुमार गेली 5 वर्ष आयपीएलपासून दूर आहे, हे विशेष.
प्रवीण कुमार खेळाबाबत बोलताना म्हणतो की, क्रिकेट पूर्णत: अनिश्चिततांचा खेळ आहे. यात चित्र बदलण्याची शक्यता हरेक क्षणी असते. कूवर पोस्ट करून प्रवीणने ही गोष्ट सांगितली. त्याने कू करत लिहिले की, “क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आयपीएलमध्ये फासे फिरवायला अजून बराच वाव आहे.”
कू पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या खेळाबाबत असे म्हटले जाते की, हा फलंदाजांसाठी तुलनेने सोपा आणि फायद्याचा आहे, पण गोलंदाजांसाठी खूप अवघड आहे. मात्र, याच साच्यात खेळणारा प्रवीण कुमार हा असा खेळाडू आहे, ज्याने फलंदाजांना धावा काढण्यासाठी अक्षरश: तरसवले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
प्रवीण कुमार आयपीएलमध्ये पाच संघांकडून खेळला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सीझन्समध्ये प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाचा भाग होते. यादरम्यान वर्ष 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी हॅट्रिकही केली होती. असे करणारा तो आयपीएलचे सातवा गोलंदाज होता. वर्ष 2011 ते 2013च्या दरम्यान प्रवीण किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळला होता.
अशाप्रकारे प्रवीण कुमारने वर्ष 2008 ते 2017 दरम्यान चार संघ, अर्थात किंग्स इलेव्हन पंजाब, सनराइजर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत आयपीएलमध्ये 14 ओव्हर मेडन टाकल्यात. प्रवीण कुमारच्या या ओव्हर्समध्ये आजवर कुठलाच फलंदाज त्याच्या चेंडूवर धावा काढू शकलेला नाही. प्रवीण कुमारच्या आयपीएल करियरबद्दल बोलायचे, तर आयपीएलच्या 119 सामन्यांमध्ये प्रवीण कुमारने 90 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा उत्साह शिगेला! केएल राहुल आऊट होताच दिली अशी रिऍक्शन, पाहा Video
‘विराटने आता विश्रांती घ्यावी’, केवळ रवी शास्त्रीच नाही, तर ‘या’ दिग्गजाचाही सल्ला






