अमेरिकेत नव्याने सुरू होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी आता संघांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार होता सार करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन होत असून, यामध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. त्यापैकी एक संघ असलेल्या सिएटेल ओरकास संघाने भारताचे माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रवीण यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे. मुंबई रणजी संघ तसेच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
एमएलसी स्पर्धेत आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व केकेआर यांच्या मालकीचे देखील संघ आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला असून, या खेळाडूंना मोठी रक्कम दिली जाईल. स्पर्धेला 13 जुलैपासून सुरुवात होईल. तर, अंतिम सामना 30 जूलै रोजी खेळण्यात येईल.
सिएटेल ओरकास संघ- क्विंटन डी कॉक, दसुन शनाका, वेन पार्नेल, सिकंदर रझा, शेहान जयसूर्या, हरमीत सिंग, शुभम रांजणे, कॅमरून गेनॉन, ऍरॉन जोन्स, नौमन अन्वर, फानी सिमाद्री, ऍंजेलो परेरा, मॅथ्यू ट्रॉम्प.
Pravin Amre Join Seattle Orcas Head Coach In Major League Cricket
महत्वाच्या बातम्या –
“संजूने तीन संघांच्या कर्णधारपदाची ऑफर धुडकावली”, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा
‘इच्छा नसताना रोहितला कसोटी कर्णधार बनवलं गेलं…’, गांगुली आणि जय शहांनी केलेला आग्रह