---Advertisement---

मयंक यादवच्या वेगवान चेंडूवर प्रीती झिंटाही फिदा! ‘डिंपल गर्ल’ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

---Advertisement---

आयपीएल 2024 चा 11 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादवचं आयपीएलच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलं. या युवा वेगवान गोलंदाजानं आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. याशिवाय त्यानं पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात तीन बळी घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.

मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू (155.8 किमी/तास) टाकून फलंदाजांमध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे. याशिवाय मयंकनं आपल्या चार षटकांत केवळ 27 धावा देत महत्त्वाचे 3 बळीही घेतले. त्याच्या बळींमध्ये धोकादायक फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश होता. हे दोघंही त्याच्या शॉर्ट डिलिव्हरीमुळे फसले. मयंकनं नंतर जितेश शर्मालाही एका शॉर्ट बॉलवरच बाद केलं. आता मयंकची घातक गोलंदाजी पाहून पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहू शकली नाही.

प्रीती झिंटानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ एक पोस्ट टाकून मयंक यादवची प्रशंसा केली आहे. प्रीतीनं ‘X’ वर लिहिलं, “21 वर्षीय मयंक यादवचं अशा प्रभावी आयपीएल पदार्पणासाठी अभिनंदन! खूप छान!!! आयपीएल 2024 चा सर्वात वेगवान चेंडू!!! 155.8 किमी प्रतितास!! पंजाब किंग्स त्यांच्या कामगिरीवर पुनर्विचार करतील आणि मजबूत पुनरागमन करतील.”

 

आयपीएल 2024 चा 11 वा सामना शनिवारी (30 मार्च) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हा सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊनं पंजाब किंग्जवर 21 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या बळावर 20 षटकांत आठ गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाबचा संघ निर्धारित 20 षटकात  गडी गमावून केवळ 178 धावाच करू शकला.

महत्त्वाच्या बातम्या-

सनरायझर्स हैदराबाद अडचणीत! मुख्य फिरकी गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर

बापरे बाप.. हा वेग आहे की मस्करी..! 21 वर्षीय मयंक यादवने टाकला IPL 2024 च्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू – पाहा व्हिडिओ । Mayank Yadav Fastest Ball Video

वानखेडेवर हार्दिक पांड्याला बूइंग करणाऱ्या चाहत्यांविरुद्ध कारवाई होणार का? एमसीएनं थेटच सांगितलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---