---Advertisement---

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एमएस धोनीचे केले या शब्दात कौतुक

On: मंगळवार, ऑक्टोबर 1, 2019 2:16 PM
---Advertisement---

सोमवारी(30 सप्टेंबर) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रांची विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभात भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की धोनीने रांचीला प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रपती कोविंद हे तीन दिवस झारखंडच्या दौऱ्यावर होते. त्याच्या या दौऱ्यादरम्यान धोनीने रविवारी(29 सप्टेंबर) पत्नी साक्षी आणि मुलगी झीवासह त्यांची भेट घेतली होती.

या भेटीचा उल्लेख करताना दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती कोविंद म्हणाले, ‘एमएस धोनीने माझी काल(रविवारी) शिष्टाचार म्हणून भेट घेतली. मला छान वाटले.’

‘मी त्याला म्हणालो की प्रसिद्धीपासून दूर राहूनही लोक त्याच्यावर प्रेम करतात, कारण तो प्रतिभाशाली आहे. त्यांची प्रतिभा झारखंडमधील प्रतिभेला प्रतिबिंबित करते. धोनीने रांचीला क्रिकेट जगतात प्रसिद्ध केले आहे.’

याबरोबरच राष्ट्रपती कोविंद यांनी झारखंडमधील अन्य व्यक्तिमत्त्वांच्या कामगिरीचेही कौतुक केले आहे. यामध्ये  तिरंदाज दीपिका कुमारीचे तसेच 1928 च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे कर्णधार जयपाल सिंग मुंडा यांचेही कौतुक केले आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने नोव्हेंबरपर्यंत क्रिकेटमधून ब्रेक घेतला असल्याचे काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते. त्याने भारताकडून शेवटचा सामना 2019 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत खेळला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

पंत-साहापैकी या खेळाडूला मिळाली संधी; द. अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

ठरलं! यादिवशी होणार आयपीएल २०२०चा लिलाव

…तर कोहलीची टीम इंडिया भारतात करणार ‘विराट’ विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment