वनडे विश्वचषक 2023 मधील 13 वा सामना अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. गतविजेता इंग्लंड सलग दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवू शकतो.
गतविजेत्या इंग्लंडला स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात न्यूझीलंडने एकतर्फी पराभूत केले होते. त्यांनी पुनरागमन करत आपल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत पहिले गुण मिळवले. दुसरीकडे अफगाणिस्तानला आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मात दिली. त्यामुळे त्यांच्यावर या सामन्यात तिसरी हार टाळण्याचा दबाव असेल.
इंग्लंड संघासाठी त्यांचे सर्व प्रमुख फलंदाज शानदार फॉर्ममध्ये दिसत आहेत. तर गोलंदाजीत टोप्ली व वूड ही वेगवान जोडी चमकदार कामगिरी करताना दिसली. अफगाणिस्तान संघासाठी त्यांचे फलंदाज आव्हानात्मक धावसंख्या असून देण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, त्यांचे अनुभवी फिरकीपटू हे अद्याप फॉर्ममध्ये आलेले नाहीत. त्यामुळे नबी, राशिद व मुजीब यांना आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल.
हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर पहिल्या दोन सामन्यात मोठ्या धावा झालेल्या दिसल्या. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, रीस टोप्ले
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी
(Preview England v Afghanistan 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
“आम्ही आता अधिक धोकादायक बनू”, तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा एल्गार
कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास! दोन धडाकेबाज फलंदाज तंबूत