वनडे विश्वचषक 2023 मध्ये सोमवारी (16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला जाईल. हा स्पर्धेतील 14 वा सामना असणार आहे. लखनऊ येथील श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम, येथे हा सामना पार पडेल. उभय संघ या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपले खाते खोलण्याचा प्रयत्न करतील.
स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी पराभूत केले. दुसरीकडे श्रीलंकेने दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्या विरुद्ध झालेल्या आपल्या दोन्ही सामन्यात संघर्ष केला. मात्र, ते विजय रेषा पार करू शकले नाहीत.
इकाना स्टेडियम येथे फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. या सामन्यापासून श्रीलंका संघाचे नेतृत्व कुसल मेंडिस हा करेल. नियमित कर्णधार दसुन शनाका हा दुखापतग्रस्त होऊन स्पर्धे बाहेर गेला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आपल्या संघात बदल करण्याचे दाट शक्यता कमी आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची मदार आपल्या अनुभवी फलंदाज व अनुभवी गोलंदाजांवर असेल. या सर्वांना एकसाथ चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. तर, श्रीलंकेला पुन्हा एकदा कर्णधार कुसल मेंडीस याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा असतील.
उभय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
कुसल मेंडिस (कर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, चमिका करूणारत्ने, धनंजय डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुनिथ वेललागे, मथीशा पथिराना, कसून रजिथा.
ऑस्ट्रेलियाला सावरण्यासाठी येणार संकटमोचक! ‘या’ दिवशी भारताकडे करणार प्रयाण
‘आता सुरुवात करावी लागेल’, पहिल्या दोन पराभवांनंतर कमिन्सने उचलला विडा, प्रत्येक सामना फायनलप्रमाणे