शुक्रवारी (१६) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा ६ विकेट्सने पराभव झाला. परंतु पंजाब किंग्ज संघाकडून एकहाती झुंज देणाऱ्या शाहरुख खानचे सह संघमालकीण प्रिती झिंटाने तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. संघातील मुख्य फलंदाज लवकर बाद झाले असताना, शाहरुख खानने ३६ चेंडूत ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर १०६ धावांपर्यंत मजल मारली होती.
यानंतर पंजाब किंग्ज संघाची सह संघमालकीण प्रीती झिंटाने, शाहरुख खानचे कौतुक करणारे एक ट्विट केले. ज्यामध्ये तिने लिहिले की, “आज आमची रात्र नव्हती पण काही सकारात्मक गोष्टी घडल्या. शाहरुखने दबावाच्या परिस्थितीत देखील चांगली फलंदाजी केली. तसेच गोलंदाजांनी मागच्या सामन्यापेक्षा चांगली गोलंदाजी केली. हा पराभव विसरून पुढे जाणेच योग्य असणार आहे. मला आशा आहे की, आज झालेल्या सामन्यातून पंजाब संघाला खूप काही शिकायला मिळेल. तसेच सीएसके संघाने चांगला खेळ केला. ”
https://twitter.com/realpreityzinta/status/1383118644540936192?s=20
चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून मिळवला विजय
पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या १०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू पलेसिने ३६ धावांची खेळी केली तर, मोईन अलीने ताबडतोड ४६ धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाड ५ धावा करत माघारी परतला होता. या विजयासोबतच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत पहिल्या विजयाला गवसणी घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा तर सरळ सरळ जडेजाचा अपमान’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची बीसीसीआयवर आगपाखड
धोनी म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या ‘काळजाचा ठोका’; प्रशिक्षकाने केलं तोंडभरुन कौतुक